♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार- छगन भुजबळ

जनहित न्यूज नासिक चिफब्युरो:रोशन गव्हाणे

नाशिक मध्ये ‘आनंदाचा शिधा’ चे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले वितरण

नासिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीर सावरकर हॉल,सावता नगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, नानासाहेब महाले, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, आर.आर पाटील, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, दत्ताकाका पाटील, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र पाटील, मुकेश शेवाळे, संतोष भुजबळ, रवींद्र शिंदे, अक्षय परदेशी, दिलीप तुपे, आबा आमले यांच्यासह यांच्यासह रास्तभाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिकरोड येथील पुरवठा अधिकारी कार्यालय हे आहे त्याचठिकाणी ठेवून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. गौरी गणपती, दिवाळी आणि गुढीपाडवा या तिन्ही सणांना शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणाडाळ व 1 किलो तेल या चार जिन्नसाचा समावेश असलेला संच वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गौरी गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रतिशिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे केवळ 100 रूपयांत वितरीत केला जाणार असून जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असून शहरातील 230 रास्त भाव दुकानांतून या शिधा संचाचे वाटप होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा हा शिधापत्रिकाधारकांचा हक्क असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोहचला पाहीजे, या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी योवळी दिल्या.

येत्या दोन ते तीन दिवसांत रास्त भाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा वितरण पूर्ण करावे तसेच जर वाहतुकीत पावसामुळे हा शिधा जर खराब झाला तर त्याची तपासणी करण्यात यावी व खराब संचाचे वितरण नागरिकांना करण्यात येवू नये, अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आंनदाचा शिधा वाटपाचा घेतलेल्या निर्णयामुळे सणांचा आनंदाचा गोडवा निश्चितच वाढणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा संचाचे विरतण करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles