♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चक्क. पिकप ने रेल्वे स्टेशनचे गेटच उडवून टाकले गेट नंबर 105 लासलगाव रेल्वे स्टेशन येथील घटना

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

सविस्तर वृत्त असे की आज सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींनी जोरात आवाज आल्याने पाठीमागे पळत जाऊन बघितले असता रेल्वे गेट नंबर 105 जवळ एका पिकप गाडीने रेल्वेचा गेटच उडवून टाकला असे निदर्शक ग्रामस्थांनी सांगितले.

प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचताच गेटवर उभे असलेल्या सोनवणे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात आली सदरील पिकप MH 41 AU 5284 ही गाडी लासलगावहून चांदवडच्या दिशेने जात असताना रेल्वे गेट 105 जवळ टपरी मध्ये काही वस्तू घेण्यास उभे होते नंतर रेल्वे गेट उघडण्याचा आवाज आल्यानं गाडी जोरात निघाली असताना गेट पूर्णपणे वर जात नाही तोच गाडी ड्रायव्हरने गाडी पुढे घेतले असता गेटला धक्का लागून सदरील गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तेथील आरपीएफ यांनी घटनास्थळी येऊन त्या पिकप गाडीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याच्या दिशेने पाऊल उचलले सदरील घटनेची माहिती लासलगाव गेटवरील असलेले सोनवणे यांनी दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles