♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगावात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

लासलगाव मध्ये मोबाईल दुकान ,साड्यांचे दुकान, तसेच बँकांचे एटीएम मशिन चोरीच्या घटना मध्ये जास्तच वाढ झाल्याचे दिसून येत आहे

दिनांक 13 रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास लासलगाव येथील गजबजलेल्या ठिकाणी मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण सुभाष क्लॉथ सेंटरच्या पाठीमागे असलेले आशापुरा साडी सेंटर या दुकानात दोन अज्ञात महिलांनी दिवसाढवळ्या 15 ते 20 हजार रुपयांच्या साड्या चोरून नेल्या. सीसीटीव्ही मध्ये चोरणाऱ्या महिलांनी हातचलाखीने साड्या चोरण्याचा प्रकार कैद झाला आहे.

 

याचा किंचित मात्र पत्ता त्या दुकानदाराला पडला नाही ह्या दोन महिला ज्यावेळेस निघून गेल्या त्यानंतर दुकानदाराच्या लक्षात आले की आपला पंधरा ते वीस हजार चा माल चोरीस गेला.

आशापुरा साडी सेंटर चे मालक जनहित न्यूज24 च्या प्रतिनिधीशी संपर्क करून या गोष्टीची माहिती दिली त्यानंतर लासलगाव पोलीस स्टेशन यांना संपर्क केले असता लासलगाव पोलीस स्टेशनची टीम वेळीच घटना स्थळी दाखल होऊन चोरी केलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच त्या महिलांचे फोटो घेतल्यानंतर पुढील चौकशी आम्ही करू असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

दरम्यान गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये लासलगाव येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे लासलगाव बस स्थानक परिसरात काही गुंड प्रवृत्तीचे लोकांकडून काही महिलांना तसेच मुलींना छेडछाडीचे प्रकरण बघण्यात आले आहे तसेच मोबाईल चोरी आणि एटीएम फोडण्याचे प्रकार हे लासलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात घडले आहे, तरी लासलगावकरांची मागणी आहे की या चोरांना लवकरात लवकर लासलगाव पोलिसांनी अटक करुन कडक कारवाई करावी अशी मागणी लासलगाव येथील नागरिकांकडून होत आहे.

लासलगाव येथील दुकानदारांना अगोदरच पाऊस नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे पिक जळून गेल्याने दुष्काळाचे सावट समोर नजर येत आहे त्यात अशा चोरीच्या घटना होणे अतिशय निंदनीय आहे.

दुष्काळाच्या सावटात सतर्क राहण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे. पाऊस हा कमी झाल्याने चोरांचे सत्र वाढत चालले आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles