♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक आम आदमी पार्टीकडून अनंतनाग जिल्ह्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

जम्मू येथील अनंतनाग जिल्ह्यात पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चार जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आम आदमी पार्टीकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पुतळा जाळून आणि घोषणा देत तीव्र निषेध करण्यात आला.

दोन दिवसापूर्वी काश्मीरमधील अनंतनाग या जिल्ह्यात भारताच्या जवानांवर पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भेकड अतिरेकी हल्ला करण्यात आला, त्यामध्ये भारताचे वीर जवान शहीद झाले. केंद्रामध्ये गेल्या नऊ वर्षापासून भाजपाचे सरकार असून वारंवार भारताच्या लष्करी जवानांवर काश्मीरमध्ये असे अतिरेकी हल्ले होत आहेत, याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यात भाजप सरकार अपयशी ठरते आहे.

 

अशा अतिरेकी हल्ल्याचा आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे, तसेच अशा अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.

ह्यावेळी संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, पदाधिकारी गिरीश उगले पाटील, योगेश कापसे, स्वप्निल घिया, एकनाथ सावळे, प्रदीप लोखंडे, बाळासाहेब बोडके पदमाकर अहिरे, दिपक सरोदे,अमर गांगुर्डे, अभिजीत गोसावी, चंद्रशेखर महानुभव, अमित यादव ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles