♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सम्मान

जनहित न्यूज24 नासिक चिफब्युरो:,रोशन गव्हाणे

दिनांक १५/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता भिष्मराज हॉल, पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्री. अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस दल व इतर ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले तसेच नाशिक शहरात स्थायीक असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी आज संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांची बैठक आयोजीत केली होती.

पोलीस खात्यात कार्यरत असतांना विविध ठिकाणी केलेल्या सेवेमुळे त्यांना आलेला प्रदिर्घ अनुभव नाशिक शहर पोलीस दलाचे कामकाजात कशा प्रकारे उपयुक्त ठरणार आहे याबाबत सुचना समजावुन घेतल्या.

कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त पोलीस उप अधिक्षक, श्री रावसाहेब पोटे यांनी असे सांगीतले की, सेवानिवृत्त अधिकारी जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांचा सन्मान राखलाजा वा, तसेच शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे पोलीसांची उपस्थिती दिसुन येत असल्याने गुन्हे कमी होण्यास मदत होत असले बाबत सांगीतले.

तसेच श्री. आर. आर. पाटील से.नि. सपो.आ. यांनी जे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार ज्या पोलीस ठाण्याच्या हददीत राहतात त्यांचा एक ग्रुप बनवुन सण उत्सव बंदोबस्तात त्यांची मदत घ्यावीबाबत सुचीत केले.

से.नि. सपो.आ. श्री. श्रीकांत जावळे, श्री. मंडाळेश्वर काळे, श्री. संजय ठाकुर यांनी सांगीतले की, वाहतुक विभाग हा पोलीस खात्याचा आरसा असुन त्यावरून पोलीस खात्याची प्रतिमा ठरत असते. पोलीस आयुक्त यांनी वाहतुक विभागातील टोईंग पध्दत बंद करुन ई-चलन सुविधा सुरू केली व शहरात बसविण्यात आलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था, गर्दी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण होत असल्याने पोलीस आयुक्त सरांचे आभार व्यक्त केले.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी राबविलेल्या सायबर दुत, चौक सभा, शांतता समितीमध्ये तरुणांचा समावेश, दामिनी पथक, टवाळखोर कारवाई तसेच श्री पारख अपहरण प्रकारणाचा केलेला उत्कृष्ट तपास, शहरातील लोकसंख्या वाढुन नागरीकरण मोठया प्रमाणात झालेले असतांना गुन्हयांना केलेला प्रतिबंध व शहरातील खुना सारख्या गंभीर गुन्हयांची केलेली तात्काळ केलेली उकल व त्या गंभीर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करून गुन्हेगारी टोळ्यांना लावलेला मोक्का व सराईत गुन्हेगारांनवर केलेली एमपीडीए कारवाईबाबत अभिनंदन केले.
तसेच सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवुन त्यांना सन्मानीत केल्याने समाधान व्यक्त केले व अशा बैठका वारंवार घेणेबाबत विनंती केली.

समारोप कार्यक्रमावेळी श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करून त्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करून त्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) नाशिक शहर, तसेच शहरातील वास्तव्यास असलेले से.नि. सपो.आ. श्री. रावसाहेब पोटे, श्री. धनराज दायमा, श्री. श्रीकांत जावळे, श्री. मंडालेश्वर काळे, श्री. मंगलसिंग सुर्यवंशी, श्री आर. आर. पाटील, श्री. गंगाधर सोनवणे, श्री. बाळासाहेब गायधनी, श्री. संजय ठाकुर तसेच सपोउनि भिमाजी कर्डीले, श्रे, पोउनि, दत्तात्रय कडनोर, थे. पोउनि, विजय शिरसाठ, पोउनि, जगदिश वाघमारे व इतर १५० ते २०० सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

कार्यमाचे सुत्रसंचालन पोनि. खटके, द.वि.प. यांनी करून डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles