♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश मोहिमेअंतर्गत, मातीस नमन, विरांस वंदन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

भारत मातेला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना तसेच ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता देशाच्या सरहद्दीचे दुश्मनांपासून रक्षण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करणे व आपल्या माती विषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण करणे आधी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पने अंतर्गत आज गुरुवार ,दिनांक १५/०९/२०२३ रोजी ‘मातीला वंदन आणि नमन’ हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ,भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौ जयश्रीताई अहिरराव ,धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ,नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णाताई जगताप यांच्या नियोजनातून थेटाळे गाव,निफाड तालुका सर्व महिला पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

महिला पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन पंचप्राणाची शपथ घेतली व माती कलशामध्ये टाकली हा कलश दिल्लीकडे मार्गस्थ करण्यात येणार आहे..

यावेळी भाजप महिला पदाधिकारी रुपा केदारे,भारती महाले,नंदा शर्मा,सिंधु पल्हार,योगिता आंबेकर,अनिता खैरे,सोनाली शिंदे,योगिता खैरे,उसरपंच ज्ञानेश्वर शिंदे ,माजी सरपंच दिगंबर शिंदे,शाहू शिंदे व सर्व महिला ग्रामस्थ उस्ताहाने सहभागी झाले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles