♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने खडक माळेगाव परिसरात शोककळा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

खडक माळेगाव येथे शोकाकुल वातावरणात लासलगाव पोलीस स्टेशन तसेच जवानांनी मानवंदना देत खडकमाळेगाव चे सुपुत्र योगेश शिंदे यास निरोप दिला.

निफाड तालुक्यातील खडक माळेगावचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे जवान योगेश सुकदेव शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी अपघाती दुःखद निधन झाले. गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश याने भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन कुटुंबासोबत देशाची देखील सेवा केली.

 परंतु काल अचानक दुर्दैवी अपघातामध्ये दुःखद निधनाने शिंदे कुटुंबावर तसेंच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जुलै महिन्यात निफाड तालुक्यातील धानोरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर या लष्करी जवानाचा शिंर्डी येथून दुचाकीवरुन परत येत असतांना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ते शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करुन आपल्या नातेवाईकांकडे जात असतांना ही घटना घडली होती. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर याच तालुक्यातील अपघाताची ही घटना घडली आहे.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातील खडक माळेगावचे (ता. निफाड) सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शिंदे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असो.असे वक्तव्य भुजबळांनी केले.
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे तसेच धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते – नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ,रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सी डी रोटे व सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपक गायकवाड व अन्य पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहत शोकाकुल वातावरणात निरोप दिला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles