♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सर्व निरोगी नागरिकांनी देशाचे आरोग्य उंचावण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक  सौ.सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे बाल हृदयरोग चिकित्सा, लहान मुलांच्या विविध ग्रंथीच्या आजारांची मोफत तपासणी उपचार शिबिर व भव्य रक्तदान शिबिर
भाजपा जिल्हा सरचिटणीस सुवर्णा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी सुवर्णा जगताप यांनी लहान मुलांचे आरोग्य व रक्तदानाचे महत्त्व याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश पदोपदी उन्नती करत असून या देशाचे भवितव्य भावी पिढीच्या हातात आहे त्यादृष्टीने त्यांना कसे सुदृढ व निरोगी ठेवता येईल तसेच देशातील रक्ताचा तुटवडा पाहता रक्त दानाची गरज व त्याचे महत्त्व त्यांनी यावेळेस पटवून सांगितले.

लासलगाव आणि परिसरासाठी ग्रामीण रुग्णालय हे वरदान ठरत असून सर्व प्रकारच्या तपासण्या येथे होत आहेत. डिलेवरी शस्त्रक्रिया देखील विनामूल्य होत आहे तसेच टेक्निशियन रुजू झाल्यामुळे एक्स रे आणि सोनोग्राफी देखील विनामूल्य होत असून सर्वसामान्य गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे यावेळी सुवर्णा जगताप यांनी सांगितले .
भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर यांनी आभा कार्डचे महत्व तसेच इतर आरोग्य योजनांचे महत्व सांगितले.डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रक्तदानाचे महत्त्व तसेच रक्तदान कोणी, का आणि कशासाठी करावे हे सर्वांना समजून सांगितले.
कार्यक्रमाचे आभार मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी मानले.
यावेळी ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे,निलेश जगताप, रवी होळकर, योगेश पाटील, धनंजय गांगुर्डे, रूपा केदारे, सिंधू पल्हार, ज्योती शिंदे, पियुष बंब, भोला काका पवार, आयाज शेख, राजेश रावल, डॉ. रामकृष्ण अहिरे, रवी तनपुरे, ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles