♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव नूतन विद्याप्रसारक मंडळ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी याविषयी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी प्रा.मारुती कंधारे, प्रा.सौरभ तिपायले, प्रा.अमोल पुंड, प्रा.वीरेंद्र आहेर, प्रा.लखन माने, प्रा.ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा.वाल्मीक आरोटे, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.किशोर अंकुळणेकर हे व्याख्याते म्हणून लाभले.

महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य व स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यशाळेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारी मनोवृत्ती, आत्मविश्वास, कौटुंबिक पाठबळ, तसेच नियोजन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे प्रा.भूषण हिरे यांनी सांगितले. डॉ सोमनाथ आरोटे यांनी प्रास्ताविकातुन ‘‘स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप, केंद्रीय तथा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचे अभ्यासक्रम, या परीक्षांच्या अभ्यासासाठीची रणनीती याबाबत मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे कसे जायचे तसेच अभ्यासात जिद्द, चिकाटी, मेहनत व सातत्य यांच्यासोबत आधुनिक ज्ञानसाधनांचे महत्त्व असल्यास यश नक्कीच मिळेल.’’ असे सांगितले. तर या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमधील तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी नियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रमांना पर्याय नसल्याचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि या परीक्षांची तयारी कशी करायची याबाबत प्रा.मारुती कंधारे आणि प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी सविस्तर माहिती दिली. प्रा.सौरभ तिपायले आणि प्रा.वाल्मीक आरोटे यांनी संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि त्यासाठी करायच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा.वीरेंद्र आहेर आणि प्रा.सृष्टी थोरात यांनी आय.बी.पी.एस. आणि बँकिंग परीक्षेचे स्वरूप व या परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रा.अमोल पुंड यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.लखन माने आणि प्रा.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत वर्ग २ व वर्ग ३ ची पदे कशी भरली जातात तसेच या परीक्षेचे स्वरूप कसे असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य व स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी प्रयत्न केले. प्रा.सुनिल गायकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या कार्यशाळेसाठी डॉ.नारायण जाधव, प्रा.मिलिंद साळुंके यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles