♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विंचूर येथे क्षिरसागर कुटुंबात गौरी गणपतीचे आगमन..

जनहित न्यूज24 विंचूर प्रतिनिधी:सुनील क्षिरसागर

 

 गौरी गणपती म्हणजेच महालक्ष्मी आणि तिची जेष्ठा नक्षत्रावर तीन दिवसाची पूजा केली जाते म्हणूनच तिला ज्येष्ठा गौरी असेही म्हटले जाते. विंचूर येथील पत्रकार सुनिल क्षिरसागर यांच्या घरी तीन दिवसाचे गौरी- गणपतीचे उत्साहात आगमन.


या तीन दिवसांत पहिल्या दिवशी गौरी वाजत गाजत हळदी- कुंकूवानी हाताचे ठसे घरात उमटले जातात, फुलांचा वर्षाव करत आगमन करण्यात आले व संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला.

दुसऱ्या दिवशी गौरी ला पुरणा-वरणाचा आणि करंज्या, पुऱ्या, शेव-पापडी इतर सर्व स्वीट व फळ यांचा नैवेद्य दाखवून दोन सुवासिनींना गौरी समजून त्यांची यथासांग पूजा,ओटी व जेवण दिले जाते आणि रात्री उशिरा पर्यंत सुवासिनी ,भाविक भक्तांनची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. रात्री स्रियांनी गौरी- गणपतीचे गाणे,भजणे म्हणत झिम्मा, फुगडी खेळत अगदी भक्तीमय वातावरणात जागरण केले.

 


तर तिसऱ्या दिवशी भरगच्च वातावरणातून गौरी ला निरोप देण्याची वेळ येते आणि घरातील मंडळीसह सर्व सुवासिनींच्या डोळ्यात पाणी आले. दहीभाताचा नैवेद्य, आरती करून पाच सुवासिनी कडून गौरीचे विसर्जन केले जाते. यावेळेस या पाच सुवासिनींना प्रसाद म्हणून फुटाणे वाटण्याची पद्धत आहे.

असा हा लक्ष्मी मातेच्या तीन दिवसाचा उत्साहीत व्रत (सण) पुढील वर्षाची आस लाऊन जातो..

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles