♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विंचूर व लासलगाव परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज विंचूर व लासलगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या.

यावेळी श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर,पांडुरंग राऊत, विलास विलास गोरे, डॉ.विकास चांदर, संतोष ब्रम्हेचा, गुणवंत होळकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, प्रा.किशोर गोसावी, जयंत साळी, मधुकर गावडे, आत्माराम दरेकर, मनीषा वाघ, प्रमोद धांद्रे, धनप्रतिक लुटे, ज्ञानेश्वर पवार, नानासाहेब जेऊघाले, आदित्य दिपक, राज सोनी, प्रमोद वाळूंज,नरेश परदेशी, किरण नवले, शुभम सांगळे, दत्तात्रय सूर्यवंशी, महेश राऊत,मोसीन शेख, इस्माईल मोमीन,सोहील मोमीन,कान्स भट्टड,गोपाळ भट्टड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज विंचूर शहरातील रायगड ग्रुप, शिवबा ग्रुप, एकलव्य मित्र मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळ, नवदुर्गा मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, सिद्धी विनायक मित्र मंडळ, बाजार मित्र मंडळ, भगवे वादळ ग्रुप, मुंजोबा मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, युवा प्रतिष्ठान मित्र मंडळ,जय भवानी मित्र मंडळ, जयश्रीराम मित्र मंडळ तसेच लासलगाव येथील होळकरवाडी गणेश मंडळ, लक्ष्मीनगर मित्रमंडळ,पेठेचा राजा(चांदीचा गणपती) मित्र मंडळ, गणेशनगर मित्रमंडळ व बाजारतळ मित्रमंडळ इत्यादी श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles