♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीसह नासिक शहरात निघणाऱ्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांत बदल

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नाशिक-अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीसह शहरात इतरत्र निघणाऱ्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत.


गुरुवारी (दि. २८) विसर्जन मिरवणुकीसह शुक्रवारी (दि. २९) ईद-ए-मिलादच्या जुलूसनिमित्त मार्गात बदल असतील. त्यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. अतिमहत्त्वाची वाहने, रुग्णवाहिका, पोलिस व अग्निशमन दलातील वाहनांना प्रवेश मनाई मार्गावरून जाण्यास परवानगी असेल, असे पोलिसांनी सांगितले. तर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. २८) : गणेश विसर्जन
मुख्य मिरवणूक : सकाळी दहा वाजेपासून
वाकडी बारव – कादर मार्केटमार्गे, फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरवरून गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून गोदाकाठ
१.सकाळी दहा वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत पंचवटी डेपो, सिटी लिंक तपोवन, निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस पंचवटी डेपोतून सुटतील
२. ओझर, दिंडोरी, पेठमधून येणारी वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूलमार्गे द्वारकाकडून इतरत्र जातील
३. रविवार कारंजा व अशोकस्तंभावरुन सुटणाऱ्या बसेस शालीमारवरुन निघतील व तिथेपर्यंतच येतील
नाशिकरोड : सकाळी दहा वाजेपासून:
बिटको चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – रेल्वे स्टेशन पोलिस चौकी – सुभाष रोड – सत्कार पॉइंट – देवळाली गाव गांधी पुतळा – खोडदे किराणा दुकान – वालदेवी नदीपर्यंत

पर्यायी मार्ग:
नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व बसेस दत्त मंदिर सिग्नलपर्यंत येतील व जातील. सिन्नरकडील वाहने उड्डाणपूलावरुन जातील व येतील.

देवळाली कॅम्प : दुपारी बारा वाजेपासून:
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने नाशिकरोड – देवळाली कॅम्प या रस्त्यावरील सिलेक्शन कॉर्नर – झेंडा चौक – शारदा हॉटेल – जामा मशिदरोड – जुने बस स्टँड – संसारी नाका – संसारी गाव – दारणा नदीपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल.
आनंदवल्ली: सकाळी दहा वाजेपासून
– चांदशी गाव ते आनंदवल्ली नदीपात्रापर्यंत व परतीचा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
– वाहने नाशिक तट कालवा येथून मखमलाबाद रस्त्याने रामवाडी मार्गे अशोकस्तंभ व गंगापूररोडकडे जातील.

नांदूर नाका : सकाळी दहा वाजेपासून:
– नांदूर नाका ते सैलानी बाबा चौक हा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
– नांदूर नाक्यावरुन छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन तपोनावतील स्वामी जनार्दन पूलामार्गे इतरत्र जातील व येतील

शुक्रवारी (दि. २९) : ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस:
नाशिकरोड परिसर (सकाळी ९ ते जुलूस संपेपर्यंत)
जुलूस मार्ग :
देवळाली गावातील मोहम्मदिया चौक ते गोसावीवाडी – सुभाषरोड – नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बिटको पॉइंटवरुन गाडेकर मळा जॉगिंग ट्रॅकपर्यंत

प्रवेश बंद :
१. रेल्वे स्टेशनकडून सुभाष रोड – डॉ. आंबेडकर पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बिटको चौकपर्यंत
२. बिटको चौक ते मुक्तिधाम – सत्कार पॉइंट – देवळाली गाव ते विहितगाव सिग्नलपर्यंत व विहितगाव ते महात्मा गांधी पुतळा ते देवळाली गावपर्यंत

पर्यायी मार्ग :
१. बिटको चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – रेल्वे स्टेशन पोलिस चौकी – सुभाष रोड – मालधक्का रस्त्याने विहितगावकडून देवळाली कॅम्पकडे
२. देवळाली कॅम्प – विहितगाव सिग्नल – मथुरा चौक – रोकडोबा वाडी – जयभवानी रोड – आर्टिलरी सेंटर रोडमार्गे इतरत्र

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles