♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक शहर गुन्हेशोध पथकाची कामगिरी

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नासिक शहर श्री. किरणकुमार, पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ-१, नाशिक शहर, श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९:३० वा. चे सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी झाल्याने त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ४५२ / २०२३ भा.द.वि.क ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा संवेदनशील स्वरूपाचा असल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंचवटी पोलीस स्टेशन श्री. अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार अशांना नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकीस होणेकामी मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने, पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फुटेजमधील चांदीचा मुकूट चोरी करणाऱ्या संशयीत इसमाची माहिती गुप्त बातमीदारांना दिली होती. त्यानुसार, गुन्हे शोध पथकाचे | पोशि/ २५०७ वैभव परदेशी यांना माहिती मिळाली की, पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी केलेला इसम हा गणेशवाडी, पंचवटी, नाशिक याठिकाणी आलेला आहे. त्यानुसार, पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गणेशवाडी येथे जाऊन सापळा रचून इसम नामे किरण हेमंत गांगुर्डे वय २९ वर्ष रा. कोळीवाडी, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात एक चांदीचा मुकुट मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील चौकशी कामी पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्याचेकडे मिळुन आलेल्या चांदीच्या मुकूटाचे वर्णन खालीलप्रमाणे-

१) १५,०००/- रू. किंमतीचा एक १५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट. त्याचे मध्यभागी लाल रंगाचा मनी व नक्षीकाम

चौक जु.वा. किं.अं.

सदरची कामगिरी श्री. अंकुश शिंदे सो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वपोनि / अनिल शिंदे, पोनि / सपकाळे (गुन्हे), पोनि / बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / रोहित कंदार, सपोनि / मिथुन परदेशी, पोहवा / १२०६ सागर कुलकर्णी, पोना / १६९४ दिपक नाईक, पोना / ३९१ कैलास शिंदे, पोना / २५४ निलेश भोईर, पोना / १०२ संदिप मालसाने, पोशि/ १७६१ संतोष पवार, पोशि/ २५०७ वैभव परदेशी, पोशि/ २११८ विष्णू जाधव, पोशि/ ११६५ महाले अशांनी संयुक्तिकरित्या कामगिरी केलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोना / १०२ मालसाने करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles