♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घरफोडी चोरीच्या गुन्हयातील ०२ आरोपी १८ तासाचे आत ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

सातपूर पोलीस ठाणे हददीतील कोरल ऑपसेट प्रिंटर कंपनी, प्लॉट न सी / १२/५, नाईस एरीया, एमआयडीसी सातपूर, नाशिक चे मालक अतुल उमाकांत राणे यांनी त्यांचे व्यवसायाकरीता असलेली रोख रक्कम हि त्यांचे कंपनचे कॅबीन मध्ये टेबलच्या ड्रायरमध्ये लॉक करून सुरक्षीत ठेवली होती. पंरतु दिनांक २२/०९/२०२३ रोजीचे रात्री ०८.०० पासुन ते दिनांक २४/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदरची रोख रक्कम चोरी करून नेली होती. त्याबाबत अतुल उमाकांत राणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून सातपूर पोलीस ठाणे कडे गु.र.न. २८८ / २०२३.भा.द.वि.क. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ. सिताराम कोल्हे यांनी सातपूर पोलीस ठाणे कडील घरफोडी चोरी करणा-या इसमांबाबत गोपनिय माहिती काढून त्यांचा शोध घेवून कार्यवाही करण्याकरीता मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने युनिट-२ चे पोलीस निरीक्षक श्री. रणजित नलवडे, पोउपनि / प्रसाद रणदिवे, सपोउपनि / यशवंत बेंडकोळी, पोहवा / राजेंद्र घुमरे, चंद्रकात गवळी, संजय सानप, प्रशांत वालझाडे, पोअ/जितेंद्र वजीरे तसेच सातपूर पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंकज भालेराव व मपोउपनि / अश्विनी उबाळे, पोना/ १७५८ खरपडे, पोअ / १६०५ सागर गुंजाळ, पोअ / २१०३ महाले, पोअ / २४४६ जाधव अशांनी घटनास्थळावरील मिळालेल्या भौतीक पुराव्याच्या आधारे कौशल्याचा वापर करून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) चेतन सुनिल राजे वय २८ वर्ष, रा. तिरंगा चौक, भगवान गवळी यांचे रूम मध्ये, कामगारनगर, सातपूर, नाशिक २) सागर धनंजय चौधरी वय २४ वर्ष, रा. तिरंगा चौक, भगवान गवळी यांचे रूम मध्ये कामगारनगर, सातपूर, नाशिक यांनी मिळून केला असल्याबाबत निष्पन्न झाल्याने सदर इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले असुन त्यांचेकडून ११,२५,८००/- रू जप्त करण्यात आले असून केवळ १८ तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे कडून सुरू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिदि, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रणजित नलवडे, पोउपनि प्रसाद रणदिवे, सपोउपनि / यशंवत बैंडकोळी, पोहवा / राजेंद्र घुमरे, चंद्रकात गवळी, संजय सानप, प्रशांत वालझाडे, पोअ / जितेंद्र वजीरे तसेच सातपूर पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंकज भालेराव, मपोउपनि / अश्विनी उबाळे, पोना / १७५८ खरपडे, पोअ / १६०५ सागर गुंजाळ, पोअ / २१०३ महाले, पोअ / २४४६ जाधव यांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles