♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेकायदेशीर रित्या गावठी देशी बनावटीचे पिस्तोल बाळगुन सोशल मिडीयाव्दारे फोटो प्रसारीत करणारा इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी.

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा,  डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये सोशल मिडीयावर दहशत पसरवणा-या किंवा अवैध कृत्य करून प्रसारीत करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.

दिनांक २५/०९/२०२३ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे नेमणुकीचे पोना / विशाल देवरे यांना सोशल मिडीयाव्दारे माहीती मिळाली की, एक इसमाने वाढदिवसाचे कार्यक्रमात पिस्तोल बाळगुन त्याचे फोटो काढुन इस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सदरची माहीती पोलीस अंमलदार विशाल देवरे यांनी वपोनिरी श्री. विजय ढमाळ यांना | कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा / ९०० संदिप भांड पोहवा / २२१ योगीराज गायकवाड, पो. ना. / १८८३ विशाल काठे, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोअं/ २१५४ पालखेडे चालक पो. हवा. / १३१६ नाझीम पठाण अशांनी सदर इसमाबाबत माहीती गोळा करून त्याची ओळख पटवली, सदर इसमाचे नांव गुरुविंदसिंग रशपालसिंग हुंदल वय- १९ वर्षे, राह, त्रिमुर्ती नगर, हिरावाडी पंचवटी, नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन कि.. रु. ३०,०००/- चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०२ जिवंत काडतुसे १,०००/- रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे.

सदरच्या इसमावर पंचवटी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

तरी नाशिक पोलीसामार्फत नागरीकांना सुचना देण्यात येत आहे की, कोणीही अवैध शस्त्रे बाळगु नये तसेच कोणीही सोशल मिडीयाव्दारे दहशत परविणारे व अवैध कृत्ये प्रसारीत करू नये.पोलीस आयुक्त सो. यांचे सुचनानुसार नाशिक पोलीसांची सोशल मिडीयावर करडी नजर आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हमत तोडकर, पोहवा / प्रदिप म्हसदे, संदिप भांड, योगीराज गायकवाड, पो.ना./ विशाल देवरे, विशाल काठे, प्रशांत मरकड, पोअं/ पालखेडे, अमोल कोष्टी, चालक पो. हवा. / नाझीम पठाण अशांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles