♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामपंचायत येथे “अमृत कलश यात्राचे” सवाद्य मिरवणूक.

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आजादीचा अमृत महोत्सव निमित्त ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियाना अंतर्गत “अमृत कलश” यात्रेचे आयोजन ग्रामपंचायत लासलगाव येथे करण्यात आले.

अमृत कलश यात्रेचे आयोजन ग्रामपंचायत लासलगाव ने करून या कलश यात्रेमध्ये येथील जेष्ठ नागरिक संघ, लोकनेते दत्ताजी पाटील माध्य. आणि उच्च माध्यमिक विद्यालय, श्री महावीर विद्यालय लासलगावचे शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचत गट प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रभात फेरीची सुरवात करण्यात येऊन पंचप्राण शपत घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

पारंपरिक वाद्याच्या गजरात ग्रामपंचायत कार्यालय समोरून प्रभात फेरीला सुरवात होऊन गावंतर्गत मिरवणूक काढण्यात आली. प्रभात फेरी मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’, माझी माती माझा देश, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषना देण्यात आल्या.

तसेच माझी माती, माझा देश या आशयाचा बॅनर प्रभात फेरी द्वारे झळकताना दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली सजविले होते. सजविलेल्या ट्रॉलीमध्ये ८ फुटी कलश ठेवून सुशोभीकरण केले होते. फेरी दरम्यान कलशामध्ये गावातील शेतकरी बांधव यांनी एक मूठ माती व ज्यांच्याकडे शेती नाही अशांनी एक मूठ तांदूळ टाकले. गावातून प्रभातफेरी ग्रामपंचायतीचे पटांगणावर आल्यावर येथे उपस्थितांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री.जयदत्त(काका)होळकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर,अफजल शेख ,रोहित पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर,डॉ.कैलास पाटील, त्रंबकराज बिरार ,अरविंद देसाई ,विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे साहेब, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील साहेब, ग्रामविकास अधिकारी धिवर साहेब, लासलगाव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles