♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेतकरी व नागरिक यांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार मंत्री छगन भुजबळ

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

शेतकरी व नागरिक याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून विकासाची कामे ही अविरतपणे सुरू ठेवाणार आहे.असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील विविध कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाकळी विंचूर च्या सरपंच अश्वीनी जाधव, लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष राजवाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत. ओझरखेड कॅनोल आणि चाऱ्यांच्या कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल. मांजरपाडाच्याच पाण्यामुळे ओझरखेड धरण भरते आहे. त्यामूळे ओझरखेड कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होतो आहे.येवला व निफाड तालुक्यांतील रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत.

या कामांचे झाले भूमीपूजन-उद्घाटन
1.लासलगाव स्टेशन रोड (टाकळी विंचूर) येथे 2515 निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमीपुजन (रक्कम रू. 15 लक्ष)

2.2515 निधी अंतर्गत सभामंडपाचे उद्घाटन (रक्कम रू. 15 लक्ष)

3.संधान नगर येथे 2515 निधी अंतर्गत काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन

4.टाकळी विंचूर ते 12 बंगले येथे 2515 निधी अंतर्गत भुमीगत गटार बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लक्ष)

5.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्तीत अनुषंगिक कामे करणे कामांचे भुमीपूजन ( रक्कम रू. 8 लक्ष)

6.स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे उद्घाटन (रक्कम रू.10 लक्ष)

7.2525 निधी अंतर्गत सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लाख)
8.जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत ग्रीन जीम (व्यायामशाळा) चे उद्घाटन

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलशाचे उदघाटन करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles