♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामपंचायत व थोर समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वछता मोहीम राबवण्यात आली

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आज दिनांक ०१/१०/२०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत स्वच्छता ही सेवा अभियान लासलगाव ग्रामपंचायत व थोर समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लासलगाव येथील बैठकीतील श्री सदस्य यांच्या संयुक्त विद्यमानाने लासलगाव ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेचा प्रारंभ प्रसंगी ग्रामपंचायत समोरील प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच श्री.जयदत्त होळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली.

यावेळी स्वच्छतेची शपथही घेण्यात आली.

सुरवातीला ग्रामपंचायत परिसर,टेलिफोन एक्सचेंज, पोलीस स्टेशन,एसटी बस स्टँड,महावीर शाळेसमोरील कॉलेज रोड,शास्त्रीनगर जवळील बंधाऱ्या लगत चा परिसर स्वच्छ करून आजच्या दिवशी स्वछता मोहीम राबवण्यात आली.

यावेळी गुणवंत होळकर, डॉ.विकास चांदर, ग्रामविकास अधिकारी श्री.शरद पाटील साहेब, महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ११५ व इतर २५, ग्रामपंचायत लासलगावचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन ३ टन ओला व ५ टन सुका असा एकुण ८ टन कचरा संकलित केला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles