♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक जिल्ह्यातील कांदा धान्य लिलाव बंद लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांची मागणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांदा धान्य लिलाव बंद लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील व व्यावसायिकांची मागणी. गेल्या 20 तारखेपासुन नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या निर्णयानुसार लासलगांव येथील व्यापारी असोसिएशनच्या सभासद व्यापार्‍यांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी कांदा व धान्य लिलावाचे कामकाजावर बहीष्कार टाकलेला आहे.

त्यामुळे गेल्या 12 दिवसांपासुन लासलगांव मार्केटमधील कांदा व धान्याचे लिलाव बंद असल्याने कांदा व धान्य उत्पादक शेतकर्‍यांसह गावातील छोटे-मोठे व्यावसाईक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने माननीय मुख्यमंत्री व पणन मंत्री यांचे कार्यालयास सादर केलेल्या निवेदनातील काही मागण्या ह्या केंद्र शासन स्तरावरील व काही मागण्या ह्या राज्य शासन स्तरावरील आहे. सदर मागण्यांबाबत यापुर्वी मा. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली, त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांचे अध्यक्षतेखाली, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार साहेब यांचे अध्यक्षतेखाली व सर्वात शेवटी केंद्रीय वाणिज्य मंत्री मा. ना. श्री. पियुषजी गोयल साहेब यांचे अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. ना. सौ. डॉ. भारतीताई पवार यांचे उपस्थितीत संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी तसेच व्यापार्‍यांचे व बाजार समित्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली असून त्यात केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री महोदयांनी व्यापारी वर्गाच्या काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन देऊन त्यास वेळ लागणार असल्याने तोपर्यंत बंद सुरू न ठेवता व्यापारी वर्गाने जिल्ह्यातील मार्केट कमिट्यांमधील लिलावाचे कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.
त्याअनुषंगाने लासलगांव मार्केट कमिटीचे उपबाजार आवार असलेल्या विंचुर येथील व्यापार्‍यांनी शेतकरी हित विचारात घेऊन दि. 28.09.2023 पासुन कांदा लिलावाचे कामकाज पुर्ववत सुरू केले आहे. विशेष म्हणजे तेथील धान्य लिलाव बंदच ठेवण्यात आले नव्हते. तसेच निफाड उपबाजार देखील 2, 10 ,2012 सोमवारपासून सुरू होत आहे मात्र लासलगांव येथील काही व्यापारी आपले अस्तीत्व दाखविणेसाठी मुद्दाम आडमुठेपणाची भुमिका घेऊन लासलगांवसह जिल्ह्यातील लहान- मोठ्या व्यापार्‍यांवर दबाव टाकुन अथवा तुम्ही बंदमध्ये सहभागी न झाल्यास आम्ही तुम्हाला पुढे अडचणीत आणु अशी धमकी देऊन जिल्ह्यातील लिलावाचे कामकाज बंदच ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

लासलगांव ही कांदा खरेदी-विक्रीसाठी आशिया खंडात मोठी मार्केट कमिटी आहे. त्यामुळे या मार्केट मधील कांदा व धान्य लिलाव बंद असल्याने या मार्केटवर अवलंबुन असणार्‍या अनेक छोट्या- मोठ्या व्यावसाईकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच बारा दिवसापासून मार्केट कमिटी बंद असल्यामुळे मार्केट कमिटी वरती अवलंबून असणार्‍या सर्व घटकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत तसेच माहे एप्रिल / मे पासुन अनेक शेतकर्‍यांनी चाळीत साठविलेला कांदा हा मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्याने शेतकर्‍यांना सदरचा कांदा विक्री करणेसाठी अडचण होत आहे.
आपणास विनंती की, दरवेळी वेगवेगळे प्रश्‍न निर्माण करून शेतकरी बांधव, गावातील छोटे-मोठे व्यावसाईक, मार्केट कमिटी व शासनास वेठीस धरणार्‍या अशा मुजोर व्यापार्‍यांचा शासकीय यंत्रणेकडुन शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच अशा व्यापार्‍यांचे मार्केट कमिटीने परवाने रद्द करून त्यांना दिलेले प्लॉट, जागा, शेड व इतर सोई सुविधा त्यांचेकडुन काढुन घेणेबाबत मार्केट कमिटी प्रशासनाला आदेश व्हावेत.

त्याचप्रमाणे या ना त्या कारणाने नेहमी लिलाव बंद ठेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करून लिलाव बंद कालावधीत आपल्याकडील कांदा परपेठेत पाठवुन नफा कमावणार्‍या जिल्ह्यातील व्यापार्‍यांची शासकीय यंत्रणेकडून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील मार्केट कमिट्यांमध्ये अडते / व्यापार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यापारी संचालकांनी लिलाव बंद मध्ये सहभाग घेतला असल्यास अशा व्यापारी संचालकांचे पद रद्द करणेबाबत तात्काळ कारवाई करण्याचे प्रशासनास आदेश करण्यात यावे. अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांनी केली आहे
तसेच निवेदन
1) मा. ना. सौ. डॉ. भारतीताई पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली.
2) मा. ना. श्री.अब्दुलजी सत्तार साहेब,पणन मंत्री महाराष्ट्र राज्य
3) मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब, पालक मंत्री, नाशिक जिल्हा.
4) मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, म. रा. मुंबई.
5) मा. आयकर आयुक्त साहेब, केंद्रीय राजस्व भवन, जुना आग्रा रोड, गडकरी चौक, नाशिक.
6) मा. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक.
7) मा. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहकारी संस्था, नाशिक.
8) मा. सभापती / सचिव साहेब, कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव. यांना देखील प्रती पाठवल्या आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles