♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

टाकळी विंचुर संधाननगर येथे वर्षावास धम्मप्रचन कार्यक्रमाची सांगता

जनहित न्यूज24 सौ.रत्नाताई उपाध्ये

भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर शाखा, धम्मयांन सोशल ग्रुप व विशाखा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बौध्द धम्मातील पवित्र वर्षावास कालावधी निमित्त टाकळी विंचुर संधाननगर लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सार्वजनिक सामाजिक सभागृह येथे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बौद्ध धम्मातील पवित्र वर्षावास धम्मप्रचन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.

वर्षावास कालावधी मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य  जिवन जगताना त्यांचे उपयोगी पडणारे विचार, तसेच विविध महापुरुषांच्या जीवन चरीत्रावर वर्षावास कालावधी मध्ये चिंतन,मनन करून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

धम्मप्रचन कार्यक्रमात प्रकाश संसारे,विजय अहिरे निवृत्ती संसारे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले वर्षावास धम्मप्रचन कार्यक्रम समाप्ती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य केशवभाऊ जाधव भारतीय बौध्द महासभेचे जेष्ठ बौध्दचार्य केंद्रीय शिक्षक विजय अहिरे, लासलगाव शहर शाखेचे कोषाध्यक्ष राजाभाऊ शेजवळ फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे रमेश कर्डक ऑल इंडिया पंॅथर सेनेचे शाम साळवे कवी गायक नीवृती संसारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे विजय अहिरे गुरुजी यांनी उपस्थित धम्मबांधवांना विविध उदाहरणे देत धम्मावर मार्गदर्शन केले वर्षावास समाप्ती निमित्त विशाल एलंजे यांनी खीरदान केले कार्यक्रमास सचीन पगारे,विठ्ठल निळे, अभिजित एलंजे, राम साळवे,राजु संसारे मारुती कांबळे, दिपक संसारे, रत्नाकर केदारे, काशीनाथ गांगुर्डे,विजय पटाईत, संकेत गरुड,संगराज एलंजे, रोहित निकम, संतोष गवळी, यश केदारे, सागर शिरसाट, कुणाल केदारे, महिला मंडळाच्या कल्पना एलंजे, ज्योती संसारे, कल्पना गरूड, पुजा पाठक, अनिता संसारे पल्लवी भालेराव आदि धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर अध्यक्ष प्रकाश संसारे व आभार प्रदर्शन विशाल एलंजे यांनी मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles