♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेरी माटी मेरा देश या अभियान अंतर्गत आज निफाड तालुक्याच्या वतीने अमृत कलश यात्रेचे आयोजन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

अमृत वाटिका हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : ना. डॉ. भारती पवार
मेरी माटी मेरा देश या अभियान अंतर्गत आज निफाड तालुक्याच्या वतीने अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून मातीचे कलश जिल्हा प्रशानाच्या वतीने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असून, साकारण्यात येणारी अमृत वाटिका हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणार आहे, असे प्रतिपादन निफाड येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

सुशोभित केलेल्या मातीच्या कलशामध्ये नागरिकां कडून मातीचे संकलन करण्यात आले.दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे. केंद्र सरकारने ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली येथे ‘अमृत वाटिका’ उद्यान उभारण्यात येणार आहे.

यावेळी शंकरराव वाघ, अनिलजी कुंदे, केशव आप्पा सुरवाडे, सुनील पवार, संजय गाजरे, संजय शेवाळे,किरण कुलकर्णी,शारदाताई कापसे,वि.धा व्यवहारे सर,निलेश सालकाडे, संजय धारराव, वाल्मीक गायकवाड,राजेंद्र राणा ,सीईओ अमोल चौधरी, बीडीओ महेश तहसीलदार घोरपडे साहेब,डी.वाय. एस. पी. निलेश पालवे,पी. आय. बापू महाजन सह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles