♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळाव्याचे आयोजन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आयुष्यमान भव आरोग्य विषयक विशेष मोहीम मा.प्रधानमंत्री यांचे संकल्पनेनुसार देशभरात आयुष्यमान भाव ही महत्वकांक्षी मोहीम दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत राबिविली जाणार आहे सदर मोहिमेचा उद्देश हा गावपटलीपर्यंत गुणवत्तपुर्वक आरोग्य सेवा सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हा आहे सादर मोहिमेअंतर्गत विविध आरोग्य योजना राबविल्या जाणार आहेत.जसे

1.आयुष्यमान आपल्या दरी2.आयुष्यमान सभा 3.आयुष्यमान मेळावा 4.अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधली मुलांची तपासणी

5.रक्तदान मोहीम

6.अवयव दान जागृती मोहीम

7.स्वच्छता मोहीम यात आरोग्य कर्मचाऱयांनी आभा कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड साठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ईद जनरेशन सुरू केले आहे.

,रक्तदान शिबिरे ठिकठिकाणी घेतली गेली आहेत ,अवयवदान प्रतिज्ञा घेऊन अवयवदान कर्त्यांनी वेब लिंक वर जाऊन नोंदणी केली आहे ,यात नाशिक राज्यात 3 क्रमांकावर आहे ,स्वच्छ भारत अभियान दिनांक 1 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहाने राबविण्यात आले आहे आयुष्यमान सभा गावोगावी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत राबवून सरपंच सदस्य यांच्या समवेत आभा आयुष्यमान कार्ड चे वाटप सुरू आहे योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे ,आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येऊन यात 1.असंसर्गजन्य आजार जसे मधुमेह उच्चरक्तदाब कर्करोग किडनी आजार

2.संसर्गजन्य आजार जसे क्षयरोग कुष्ठरोग

3.माताबाल तलासीकरं पोषण सल्ला गरोदर माता तपासणी

4.कांनाक घास सिकलसेल दंतरोग उपशामकसेवा नेत्ररोग त्वचा आजार इत्यादी तपासणी निदान उपचार संफर्भसेवा आभा आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण होणार आहे आहे प्राथमिक आरोग्य आयुष केंद्र ग्रामीण रुग्णालय स्तरावर महिन्यातील एक शनिवार आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहे .

ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय स्तरावर विशेषज्ञ डॉक्टरांच्या सेवा पुरविण्यात येणार आहे ,त्या अनुषंगाने दिनांक 7 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजी ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथील विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.

यात स्त्रीरोग,बालरोग,भुलतज्ञ,नेत्र चिकित्सा, कान नाक घसा ,त्वचा ,मानसिक आरोग्य, असंसर्गजन्य आजार, दंतचिकित्सा इत्यादी उपलब्ध होणार असून यांचेमार्फत तपासणी होणार आहे ,त्यामुळे परिसरातील जनतेने या आरोग्य मेळाव्यास हजर राहून आपल्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे व या आरोग्य मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ,,सदर आरोग्य मेळावा दिनांक 07/10/2023,04/11/2023,02/12/2023,30/12/2023 रोजी शनिवारी घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात नियोजन ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ बाळकृष्ण अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील ,डॉ नीलकंठ भामरे,डॉ पल्लवी गोरडे ,श्रीमती घुसले, श्री पठाण, श्री वाडीतके,श्री गणेश भवर,व इतर रुग्णालयीन स्टाफ मार्फत विशेष परिश्रम घेऊन आरोग्य मेळाव्याचे नियोजन केले आहे ,कोटमगाव फाटा ,रेल्वे स्थानक, बस स्थानक लासलगाव येथे अंबुलन्स सुविधा देऊन रुग्णालयापर्यंत रुग्णांना पोहचविण्यासाठी मदत केली जाणार असून जनतेने या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य कर्मचारी वृंदकडून केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles