♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नवरात्रोत्सव मंडळांवर का होणार गुन्हे दाखल बघा जनहित न्यूज24 वर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

गणेश विसर्जन मिरवणुकीत डी.जे.चा दणदणाट आणि लेझर किरणे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे आगामी नवरात्रोत्सव काळात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून लेझर किरणे, डी.जे अथवा तत्सम साधनांनी आवाजाची कमाल पातळी ओलांडल्यास अशा मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा लासलगाव पोलिसांनी दिला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर किरणे वापरल्यामुळे अनेक तरुणांना नेत्ररोग झाल्याचा दावा नेत्ररोग चिकित्सांकडून करण्यात आला.

 

त्यानंतर डी.जे.सह लेझर किरणांचा प्रश्न राज्यभरात गाजला. त्यामुळे या प्रकरणाची खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात आदिशक्तीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी आत्तापासून पोलीस प्रशासनाने चोख नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रीत विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून दांडिया, गरबा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डीजे लावणाऱ्या मंडळांचा परवानगी अर्ज थेट रद्द केला जाणार असल्याची माहिती राहुल वाघ यांनी दिली आहे.

नवरात्रोत्सव मंडळांनी पोलीस स्टेशनमधून आगाऊ परवानगी घ्यावी, मंगल कार्यालय अथवा सार्वजनिक ठिकाणी दांडिया, गरबा सुरू असल्यास त्या ठिकाणी डी.जे अथवा तत्सम साधनांची कमाल आवाज पातळी ही मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये, लेझर किरणांचा वापर टाळावा अन्यथा संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

 

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles