♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अंबड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून दहशत परसरविणा-या जया दिवे, किरण शेळके याच्या गुन्हेगारी टोळीस अपर पोलीस महासंचालक, मुंबई यांचेकडुन देखील मोक्का कायदयान्वये शिक्कामोर्तब

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील टोळी बनवुन खुन व खुनाचा प्रयत्न, मालाविरुध्द व शरिराविरूध्द गुन्हे करून दहशत पसरविणारे संघटीत गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्यासाठी ३७ गुन्हेगारांवर मोक्का कायदाय अंतर्गत कारवाई करून जेरबंद केले आहे.

इसम नामे राकेश कोष्टी व आरोपी जयेश दिवे यांचे आर्थीक कारणावरून व | वर्चस्वाच्या कारणावरून वाद होते. तसेच राकेश कोष्टी याची आई कपडे विक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या परिसरात जयेश दिवे व त्याचे साथीदार हप्ते गोळा करतात या जुन्या वादातुन त्यांचा वाद विकोपाला जावुन दिनांक १६/०४/२०२३ रोजी यातील बळीत इसम राकेश कोष्टी हा त्याचे मित्रासोबत मोटार सायकलने जात असतांना आरोपीत नामे किरण शेळके, जयेश दिवे, विकी ठाकुर व त्यांचे इतर साथीदार यांनी राकेश कोष्टी याचेवर फायरींग करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

अंबड पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुरनं २४२ / २०२३ भादवि कलम ३०७, १०९, ११४, १२०, २०१, ३८५, सह शस्त्र अधिनियम ३ (१) २५ सह कि. ॲमेंडमेंट लॉ कलम ७ मपोका कलम १४२ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार किरण दत्तुअण्णा शेळके वय | २९ रा. घर नं. ४४२८ कपालेश्वर मंदिरामागे, अंबिका चौक, पंचवटी नाशिक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार यांचे सोबत मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली असुन एकटयाने किंवा संघटीत रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून पंचवटी, अंबड, भद्रकाली, सरकारवाडा, आडगाव, मुंबईनाका परिसरात लोकांना धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे लोकांची लुटमार मारणे, हप्ते गोळा करुन परिसरात दहशत निर्माण केली होती. सदर टोळीतील सदस्यांविरूध्द एकुण ५९ गुन्हे पंचवटी, अंबड, सरकारवाडा व इतर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले आहेत.

तपासादरम्यान सदर गुन्हा हा संघटीत टोळीतील गुन्हेगारांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सर यांनी सदर गुन्हयातील संघटीत टोळी | सदस्यांविरूध्द दिनांक १३/०५/२०२३ रोजी “महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ ची कलमे समाविष्ट करण्यासाठी नमुद कायदयातील कलम २३ (१) (अ) नुसार परवानगी दिली होती. त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास श्री शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांनी करून आरोपींविरूध्द सबळ पुरावा प्राप्त करून मा. पोलीस आयुक्त यांचे | मार्फत मा. अपर पोलीस महासंचालक (कावसु), म.रा. मुंबई यांना अहवाल सादर केला होता.

दिनांक ०५/१०/२०२३ रोजी मा. अपर पोलीस महासंचालक (कावसु), म. रा. मुंबई यांनी गुन्हयातील आरापी नामे 1) किरण दत्तु अण्णा शेळके वय 29 रा. कपालेश्वर मंदिरामागे, अंबिका चौक, पंचवटी नाशिक 2) जयेश हिरामण दिवे वय 33 रा. पंचवटी नाशिक, 3) विकी किर्ती ठाकुर वय 28 रा. दसकगांव नाशिकरोड 4) गौरव संजय गांगुर्डे वय 32 रा. पंचवटी नाशिक 5) किरण ज्ञानेश्वर क्षिरसागर वय 29 रा. पंचवटी नाशिक 6) सचिन पोपट लेवे वय 23 रा. कांतीनगर, पंचवटी नाशिक 7) किशोर बाबुराव वाकोडे वय 22 रा. कथडा जुने नाशिक 8) राहुल अजयकुमार गुप्ता वय 28 रा. शनिचौक पंचवटी नाशिक 9) अविनाश गुलाब रणदिवे वय 26 रा. सातपुर नाशिक 10) श्रीजय संजय खाडे वय 23 रा. जुना आडगाव नाशिक पंचवटी नाशिक 11) जनार्दन खंड बोडके वय 22 रा. पंचवटी नाशिक 12) सागर कचरू पवार वय 28 रा. गणेशवाडी पंचवटी नाशिक 13) पवन दत्तात्रय पुजारी वय 23 रा. तारवाला नगर पंचवटी नाशिक 14) महेंद्र उर्फ गणपत राजेश शिरसाट वय 28 वर्षे रा. दत्तचौक पंचवटी नाशिक या आरोपींविरुध्द मोक्का कायदयातील कलम २३ (२) अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी देवुन सदर संघटीत टोळीवर शिक्कामोर्तब केले आहे.

शहरातील जे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासुन परावृत्त होणार नाहीत त्यांच्यावर मोक्का, एम. पी. डी. ए., सारख्या ठोस कारवाया सुरूच राहणार असल्याबाबत मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दाखवुन दिले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles