♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव : लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात विशेष तज्ञांमार्फत शल्यचिकित्सा , त्वचारोग,स्रीरोग , नेत्ररोग, मानसोपचार,बालरोग, कान, नाक, घसा, दंत शल्यचिकित्सा , भिषक,वरील सर्व आजारांवर विशेष तज्ञांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.


तसेच  सदर “आयुष्मान भव” कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन महिला दक्षता समिती अध्यक्ष वेदिका होळकर तसेच बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. त्याच बरोबर असंसर्गजन्य रोगविषयी माहिती देण्यात आली.आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, व आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात विषय माहिती देण्यात आली.

डॉ शिंदे यांनी सांगितले रुग्णालयात रुग्णांकडे राशन कार्ड व आधार कार्ड असणे आवश्यक आहे,तसेच दोघांवरील नावात काही बदल असल्यास ते दुरुस्त करून घेने या मुळे ऑपरेशन आदी ला अडचण निर्माण होणार नाही . तसेच ज्यांच्याकडे आधार कार्ड व राशन कार्ड नसेल त्यांनी काढून घेणे आवश्यक आहे असे हे यावेळेस सांगितले
 

यावेळी गायत्री परिवार जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चोथाणी, राधेश्याम वर्मा, हेमंत पवार,डॉ.संगीता सुरसे, राजेंद्र जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बाळकृष्ण अ Z’sहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील,डॉ नीलकंठ भामरे,डॉ पल्लवी गोरडे, श्रीमती घुसले,हाफिझ पठाण,गणेश भवर व इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आयुष्यमान भव अभियान आरोग्य मेळाव्यास लासलगाव येथिल स्थानिक लाभार्थी तसेच पचक्रोशितील लाभार्थी उत्साह व प्रतिसाद मिळाला सदरहु मेळाव्यात एकुण 457 रुग्णाची तपासणी करण्यात येऊन त्याच्यावर औषध व उपचार करण्यात आले.
1) नेत्र तपासणी रुग्ण :- 67
2) अस्थिरोग तपासणी :- 80
3) त्वचारोग तपासणी :- 32
4) मानसोपचार तपासणी :- 11
5 ) शल्यचिकित्सक तपासणी :- 60
6) स्रीरोग तपासणी :- 85
7) त्वचा रोग तपासणी :- 32
8)एम डी मेडिसिन :- 122
9) एन सि डी :- 86
10) रक्त टेस्ट तपासणी :- 255
11) ई सी जी :- 32

रेफर पेशंट :- 9

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles