♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सौ.सुवर्णा जगताप यांच्या प्रयत्नातून ना.भारती पवार यांच्या निधीतून लासलगाव येथिल अमृतनगर ते संभाजी चौक रस्त्याचे भूमिपूजन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

लासलगाव येथील अमृत नगर ते संभाजी चौक रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब होता…

अमृतनगर परिसरातील रहिवासी वरिष्ठांकडे रस्ता सुधारणा होने कामी मागणी करत होते. सदर रहिवाशांनी रस्ता सुधारणा व्हावी असे निवेदन भाजपा जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा जगताप यांच्याकडे दिले होते.

सदर रस्त्याची दुर्दशा पाहता सुवर्णा ताईंनी पाठपुरावा करून आरोग्य राज्य व कुटुंब कल्याण मंत्री भारतीताई पवार यांच्या निधीतून या रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर करून घेतले.बस स्टैंड ला जोडणारा असल्यामुळे वर्दळीचा रस्ता आणि शाळा तसेच कॉलेज ला जाण्यासाठी मध्यवर्ती असणारा रस्ता त्यामुळे परिसरातील जाणारे विधार्थी आणि रहिवासी यांच्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता होता.

सदर रस्त्याचे भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी परिसरातील लोकांशी चर्चा करताना लासलगाव मधील अनेक रस्त्यांचे निवेदन त्यांच्याकडे सदर परिसरातील ग्रामस्थांनी सादर केलेले आहेत.

भविष्यात जे जे रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहे त्यांचा पाठपुरावा रस्ते ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या निधीतून पाठपुरावा करणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

रस्त्याचे काम चालू होणार असल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आणि आभार मानले.

यावेळी लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे , भाजपा ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर, दत्तू लालजी शर्मा, रूपा केदारे, ज्योती शिंदे, शैलजा भावसार, पुष्पा आहेर, कलावती महाले, रमा वर्मा, लिलाबाई बंब, सुमन वैष्णव, नंदा डमरे, पुष्पा वाडलेकर, अंजू वर्मा, पुष्पा आहेर, परवीन मंसूरी, खुशी शिखलकर, चंद्रकांत गंभीरे, काशिनाथ महाले, घोलप बंधू, खांगळ भाऊ, मनोज वर्मा, बापू लचके, निलेश जगताप, लक्ष्मण खलसे, भोला काका पवार, सुनील नेवगे, सचिन शिंदे, दत्तात्रय माळी, संपत घोलप, निवृत्ती खांगळ, मधुकर कदम, सुखदेव घोलप, राजेंद्र जाधव, सिकंदर शिखलकर, कैलास दवणे, अरुण गवळी, राजेंद्र निकम व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles