♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चेन स्नॅचिंग गुन्हयातील आरोपीचा १२ तासाचे आत शोध सातपूर पोलीसाची दमदार कामगिरी

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

फिर्यादी सौ. कांता शांतीलाल बरडिया, वय ६६ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. रूम नं.७७२, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, सातपुर, नाशिक मो.नं. ९४०३१६२७२१ हया त्यांचे पती शांतीलाल बरडिया सह जेवण करून रात्री ०९:०० वा. चे सुमारास त्यांचे राहते घराचे पायरीवर बसले होते. त्यानंतर त्याचे पती शांतीलाल बरडिया हे फिरण्यासाठी गेले असता फिर्यादी या एकटयाच बसलेल्या होत्या. रात्री ०९.१० वा. चे सुमारास एक इसम पायी चालत आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची मंगळसूत्र पोत (किंमत रू. ६०,०००/-) खेचुन जिजामाता शाळेच्या ग्राऊडकडे पळून गेला.

त्यावेळी फिर्यादीने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी सदर इसमाचा शोध घेतला असता मिळून आला नाही. यावरून फिर्यादी सौ. कांता शांतीलाल बरडिया यांनी सातपुर पो.स्टे. येथे गुरनं. ३०५/२०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला.

त्याअनुषंगाने सातपुर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथक तात्काळ घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून गुन्हयाचे वस्तुस्थितीची माहिती घेतली. तांत्रिक पध्दतीने आरोपीचा शोध घेणे आवश्यक असल्याने तपासास गती देवुन शोध मोहिम सुरू केली. त्यावर सदर इसमाचे नाव व पत्ता स्थानिक गोपनिय बातमीदाराकडून गोपनियरित्या माहिती मिळविली असता त्याचे नाव विरेन चेतन वाघ असे असल्याचे समजले.

त्यावरून त्याचे राहते घर रूम नं.१२८५, एम. एच.वी. कॉलनी, शिवनेरी गार्डन, सातपुर कॉलनी, सातपुर, नाशिक येथे छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडून गुन्हयातील गेलेला मुद्देमाल दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र पोत (किंमत रु. ६०,०००/-) हस्तगत केले आहे.

सदर गुन्हातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर,मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २. नाशिक शहर, शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शन व सातपुर पो स्टे से वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंकज प्रल्हाद भालेराव यांचे सुचनाप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी पोउनि श्री बाळासाहेब वाघ, तपास अधिकारी पोउनि अश्विनी उबाळे तसेच पोहवा / ११३. विलास गिते, पोहवा ५८६ दत्तु गायकवाड, पौना / १७५८ दिपक खरपडे, पोअ / १६०५ सागर गुंजाळ, पोअं/२१०३ अनंता महाले, पोअ / २२४६ संभाजी जाधव, पोअं/ १४८ रामनाथ पाटील, पोअ / ९५१५ भूषण शेजवळ, चापोअ/७०७ रोहिदास कनोजे व चापो / ११४ विश्वास पाटील यांनी कामगिरी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles