♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर विशेष मोहिम राबवुन केली कारवाई

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हददीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करणारे सराईत इसम तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव तयार करून शहरातील | शांतता बिघडवणारे इसमांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखा यांना आदेशीत केले होते.

पोलीस आयुक्तांचे आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील अंमली पदार्थाचे विक्री/सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईत इसमांचा शोध घेणेकामी तसेच टवाळखोरावर कारवाई करणेकामी पोलीस उप आयुक्त, गुन्हे व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ व २ यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथके तयार करून सर्व पोलीस ठाणे हददीत विशेष मोहिम राबविण्यात आली.

सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २५० इसमांविरुध्द व परिमंडळ-२ हददीतील ९९ इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी शाळा / महाविदयालयातील मोकळया पटांगणात धुम्रपान करणारे तसेच तंबाखुजन्य पदार्थाची | विक्री करणारे एकुण ३३ इसमाविरूध्द कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेवुन कारवाई केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles