♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जैन सोशल ग्रुप च्या वतीने गरबा स्पर्धा गणेश नगर, लासलगाव येथील श्री गणेश मंदिरात शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

जैन सोशल ग्रुप च्या वतीने गरबा स्पर्धा गणेश नगर, लासलगाव येथील श्री गणेश मंदिरात शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. जैन सोशल ग्रुप तर्फे ही स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली व या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ही भेटला.

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सुवर्णा जगताप यांचे या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य लाभले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कोरिओग्राफर कल्पेश सर,सुवर्णा जगताप व डॉ. संगीता सुरसे यांनी काम पाहिले.

स्पर्धेमध्ये पहिला क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम 3001 नारीशक्ती ग्रुप यांना तर सुनिता वर्मा यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 2001 रुपये आणि साक्षी शहा यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 1000 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

यावेळी कोरियोग्राफर कल्पेश सर, नारी शक्ती ग्रुप च्या नमिता साबदरा, हर्शाली डुंगरवाल, प्रियंका डुंगरवाल, भावना साबद्रा, नेतल धाडीवाल, मयूरी डुंगरवाल, साक्षी साबद्रा, सेजल जांगड़ा, जैन सोशल ग्रुपचे सदस्य श्रेया मुनोत, हर्षाली डुंगरवाल, सेजल ब्रम्हेचा, मयूरी भंडारी, कोमल चंडालिया, पायल धाडीवाल, निकिता ताथेड, श्वेता चोर्डिया, प्रियंका डुंगरवाल,मयुरी डुंगरवाल, नेतल धाडीवाल, सुरभी राका, दिव्या जैन,पूजा जैन, रिया चोरडिया, चंचल नहाटा, निकेता कोचर, भाविका बागमार, पल्लवी धाडीवाल, नेहा रेदासनी ,दीपिका रेदासनी ,चैताली मुनोत, मयुरी ताथेड,नेहा ब्रम्हेचा, प्रांजल धाडीवाल ,सपना आबड, सरिता नहाटा ,कोमल जांगडा, कृतिका जांगडा,पायल साबद्रा या सर्वांच्या सहकार्याने व परीसारतील महिलाच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles