♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगावमधील राजकारणातील वर्तुळात स्फोट,जयदत्त होळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदांचा राजीनामा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

निफाड तालुक्यातील लासलगाव मधील कांद्याची बाजारपेठ असलेल्या ठिकाणी काल रात्री एक राजकीय बॉम्ब फोडल्याचे निदर्शनास आले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच लासलगाव ग्रामपंचायत सरपंच व राष्ट्रवादीचे कट्टर नेते जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा जाहीर करताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .

मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी येवला येथे सभा घेतली. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त असून कोणताही राजकीय हस्तक्षेप त्यांना नको असल्याने एक मराठा लाख मराठा या आमच्या बांधवांसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे .

लासलगाव मध्ये राजकीय वर्तुळात मराठा समाजाचा एकमेव चेहरा जयदत्त होळकर असून लासलगाव पंचक्रोशीतून जयदत्त होळकर यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. लासलगाव येथील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.लासलगाव ग्रामपंचायत सरपंच तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक जयदत्त होळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली जनहित न्यूज24 च्या प्रतिनिधीशी बोलताना मराठा समाजासाठी आपण सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहोत व पुढील वाटचालीस कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना मात करण्यास आपण सज्ज आहोत असा संदेश जयदत्त होळकर यांनी दिला .

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles