♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणजाई मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून सामुदायिक दुर्गा सप्तशती पठण.

जनहित न्यूज24 विंचूर प्रतिनिधी – सुनील क्षिरसागर.

पं.पू. गुरुमाऊली आण्णा साहेब मोरे प्रमुख दिंडोरी श्री स्वामी समर्थ दरबार यांच्या आज्ञेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी निफाड तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती लोनजाई माता मंदिरात. विंचूर पासून जवळच असलेल्या सुभाष नगर येथील या लोनजाई गडावर अश्विन नवरात्र निमित्त तालुकास्तरीय सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन सोहळा, शुक्रवार दि. २० तारखेला दुपारी १ वाजता सहावी माळ या शुभमुहूर्तावर करण्यात आला होता.

यावेळी गडावर निफाड तालुक्यातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी स्रि व पुरुषांनी केंद्राच्या सेवा मार्गाच्या वतीने आयोजित श्री दुर्गा सप्तशती पाठ पठण साधारण २२६८ महिलांनी सहभाग नोंदवला.

या भगवतीची विशेष सेवा मार्गात श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री कालभैरवाष्टक, श्री महामृत्युंजय मंत्राचा जप, श्री स्वामी समर्थ मंत्र जप सामुदायिक पठण करण्याचे आयोजन केले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles