♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे नवरात्रीत नवदुर्गानी सजविली रांगोळी स्पर्धा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:,सौ.रत्नाताई उपाध्ये

नवरात्रीच्या निमित्ताने लासलगाव मधील नावाजलेले सराफ श्री मुरलीधर गंगा किसन वर्मा यांच्यातर्फे दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी श्री गणेश मंदिर गणेश नगर ग्रामपंचायत हॉल लासलगाव येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

रांगोळी ही भारतामध्ये ६४ कलाप्रकारापैकी एक कला असून महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.हाच धागा पकडून महिलांमधील ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्मा ज्वेलर्स यांनी व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक सुवर्णा जगताप यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.

पारितोषिक वितरण समारंभ श्री गणेश मंदिराच्या सचिव सौ सुवर्णा जगताप यांच्या अध्यक्षतेत करण्यात आला.यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संगीता सुरसे व संस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर ड्रॉइंग टीचर रेश्मा वैष्णव व प्रिया वर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेमध्ये सुमारे ३५ महिलांनी भाग नोंदविला होता.पहिला क्रमांक शबाना कादरी दुसरा क्रमांक साक्षी मालपाणी तिसरा क्रमांक प्रेरणा शिरसाठ यांनी पटकावला .तर उत्तेजनार्थ अश्विनी राऊत यांनाही बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेसाठी लासलगाव परिसरातील भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.कार्यक्रमाचे आयोजन मुरलीधर वर्मा ज्वेलर्स चे संचालक निलेश वर्मा आणि महेश वर्मा यांनी केले.यावेळी रेखा वर्मा गौरी वर्मा आंजू वर्मा श्वेता मालपाणी प्रियांका चोथानी कविता लोहारकर यांची उपस्थिती लाभली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles