♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे शॉट सर्किटने भीषण आग लागून एक ते दीड कोटींचे नुकसान आशिया खंडातील नावाजलेली कांद्याची बाजारपेठ असून अग्निशमन दलाची गाडी नाही

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव कोटमगाव रोड येथील बँक ऑफ इंडिया समोरील गाळ्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा च्या रात्री आठ ते दहा दुकानांना आग लागून एक ते दीड कोटी चे नुकसान आगीच्या थारोळ्यात जळून खाक झाले आहे.

संपूर्ण लासलगाव करांमध्ये एकच रोष व्यक्त करण्यात येत आहे .येवला लासलगाव मतदार संघात आमदार ,खासदार, कॅबिनेट मंत्री केंद्रीय मंत्री अशा प्रकारचे पद असून सुद्धा लासलगाव येथे अग्निशमन दल का नाही? पिंपळगाव बसवंत, येवला, मनमाड, चांदवड च्या भरोशावर किती दिवस राहणार , लासलगावकरांना मूलभूत सुविधा का मिळत नाही हा प्रश्न उपस्थित नागरिकांमध्ये एक चिंता व्यक्त करण्यासारखा आहे.

कोजागिरी पौर्णिमा ची रात्र ही लासलगावकरांसाठी काळी रात्र ठरली कोटमगाव रोड येथील आठ ते दहा दुकानांमध्ये लागलेल्या आगीत मल्चिंग पेपर, बियाणे, मोटर सायकल रिपेरिंग इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग सलून व्यवसाय तसेच कपड्याचे व्यापारी व खतांचे व्यापारी यांचे दुकान जळून खाक झाले आहे.

सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे सर्व व्यवसायिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी घटनास्थळी माहिती घेत असताना ज्या दुकानदारांवर ही परिस्थिती ओढवली आहे त्यांना अश्रू अनावर होत नव्हते.आज ऐन दिवाळी दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे.

लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतीक चोथानी यांनी त्वरित पिंपळगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केला, तसेच डी के नाना मित्र मंडळ टॅंकरने सुद्धा परिस्थितीला मोठ्या प्रमाणात मदत केल्याने मोठा अनर्थ टळला.

शेखर होळकर यांचेही टॅंकरने मोठे योगदान झाल्याने लासलगावकरांनी सुटकेचा विश्वास घेतला.

दरम्यान नुकसान झालेल्या दुकानदारांची नावे यशवंत ट्रेडर्स, प्रवीण सोनवणे, यशवंत न्यू ट्रेडर्स, अशोक सोनवणे, किसान कृषी उद्योग, आकाश सोनवणे, कृषीधन ऍग्रो सर्विसेस , विजय निकम,शुभम सलून , अविनाश देसाई(दिव्यांग),फिरोज गॅरेज, फिरोज पठाण, आर के ट्रेडर्स, रामनाथ असुले, सोमवंशी व प्रशांत कदम हे दुकानदार यांचे व्यवसाय आज सर्व जळून खाक झाल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने पंचनामा करून योग्य ती मदत करावी अशी लासलगावकरांची मागणी होत आहे.

येवला लासलगाव मतदार संघातील लासलगाव हे भुजबळांनी दत्तक घेतलेले गाव म्हणून ओळख असलेले गाव मग येवल्यात 4 अग्निशमन दल मग लासलगावात एकसुद्धा नाही असा दुधाभाव का हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न 

आज लासलगाव च्या जनतेची व जनहित न्यूज24 च्या वतीने प्रशासनास एकच निवेदन आहे की एकतरी अग्निशमन दल मिळावा ही विनंती करत आहेत.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles