♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शासनाकडुन येणारे अनुदान थकीत असल्याचे सांगणे हे धादांत खोटे

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव विंचूर सह १६ गावे पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांच्याकडुन नागरिकांची दिशाभूल सूरू असुन शासनाकडुन येणारे अनुदान थकीत असल्याचे सांगणे हे धादांत खोटे असल्याचा आरोप विरोधी सदस्य शेखर होळकर आणि सुवर्णा जगताप यांनी केला आहे.

 

लासलगावसह सोळा गावांना वरदान ठरलेल्या सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे तब्बल ४ कोटी ७४ लक्ष रुपयाचं बिल थकल्याने महावितरण कडून १५ दिवसांत बिल भरण्यात यावे अन्यथा वीज खंडित करण्याबाबत नोटीस सोळागाव पाणी पुरवठा समितीस देण्यात आली आहे.

त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर लासलगाव विंचूरसह सोळागावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाल्यामुळे वातावरण तप्त झाले आहे.

प्रादेशिक पाणीपुरवठा समितीची वीज बिल भरणा करण्याची जबाबदारी आहे.समितीने पाणी पट्टी वसूल करून महावितरणला संपूर्ण वीज भरणा केल्यानंतर ४० टक्के रक्कम शासन जिल्हा परिषदे मार्फत ग्रामपंचायतीला परतावा देत असते,यापूर्वी सुद्धा अनेकदा वीज कनेक्शन तोडण्याची वेळ आलेली असताना,लोक प्रतिनिधींनी हस्तक्षेप करून मुदतवाढ घेऊन वीज खंडित करण्यापासून वाचवले होते.

त्याच वेळी वीज मंडळाने सांगितले होते की लवकरात लवकर थकीत रक्कम भरणा करावी वीज मंडळाकडे रक्कम भरणा झालाच नसेल तर शासनाकडून परतावा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

४० टक्के वीज बिल शासनाने भरावे असा कोणताही शासन निर्णय किंवा कोणतेही शासकीय परिपत्रक उपलब्ध असल्यास जनतेसमोर समितीनेआणावा.

आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ६० टक्के तरी रक्कम भरावी मात्र लोकांची दिशाभूल करू नये अशी प्रतिक्रीया संगीता पाटील,अमोल थोरे आणि दत्ता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आतापर्यंत शासनाकडून मिळालेला परतावा,विविध ग्राम पंचायती कडून जमा झालेली वसुलीची रक्कम,वीज मंडळाला भरलेला वीजबिल, व इतर कारणाने केलेला खर्च पाणी पुरवठा समितीने जनतेसमोर मांडला पाहिजे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असे…..

ग्रामपालिका सदस्य शेखर होळकर,सुवर्णा जगताप,संगीता पाटील,अमोल थोरे,संतोष पलोड,दत्ता पाटील,ज्योती निकम,अश्विनी बर्डे यांनी म्हटले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles