♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तसेच दुरूस्ती व इतर अनुषंगिक कामे जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज भुजबळ फार्म नाशिक येथे लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची दुरूस्तीचे प्रलंबित कामांसह पंपींग हाऊस मधील पंपाची कामे डिसेंबर पर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. राजापूर सह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाची ४१ पाण्यांच्या टाक्यांपैकी २६ टाक्यांचे कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेचे उर्वरित कामे कालमर्यादेत मे २०२४ अखेर करण्यात यावीत. लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शिल्लक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच लासलगाव विंचूरसह सोळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सौर प्रकल्पांच्या कामांसाठी आवश्यक निधी हा मंजूर झाली असून सौर प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महवितरणला योजनेचा डि.पी.आर सह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles