♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिन्नर मध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचा भव्य शिधापत्रिका वाटप मेळावा संपन्न

जनहित न्यूज24 :संपादकीय विभाग

दोन महिन्या पूर्वी माननीय बच्चुभाऊ कडू त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिन्नरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने सिन्नर तालुक्यामध्ये गरजू दिव्यांगांना प्राधान्य व अंत्योदय कार्ड मिळविण्यासाठी प्रस्ताव जमा करण्यात आले होते.

यामध्ये 240 प्रस्ताव तयार करून मंजूर करण्यात आले आणि आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सिन्नर चे तहसीलदार साहेब आदरणीय देशमुख साहेब व पुरवठा निरीक्षक धुमाळ साहेब यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

याप्रसंगी साहेबांनी दिव्यांगाना जास्तीत जास्त शिधापत्रिका देण्यात येऊन सर्वांना लाभ घेण्याची शासनाच्या योजनांची माहिती व संजय गांधी निराधार योजना या संदर्भात माहिती देण्यात आली.

सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिधापत्रिका घेताना प्रत्येक दिव्यांग च्या चेहऱ्यावर विशेष आनंद झळकत होता.

तसेच याप्रसंगी सिन्नर तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय तहसीलदार साहेब यांचा सत्कार प्रहार दिव्याग संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण पाचोरे यांनी केला.

 

पुरवठा निरीक्षक धुमाळ साहेब यांचा सत्कार दौलत ढोली संपर्क प्रमुख त्यांनी केला समता परिषदेचे सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्रजी जगताप यांचा सत्कार उपाध्यक्ष गणपत नाठे यांनी केला कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ जी कराड यांचा सत्कार शहराध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी केला मार्गदर्शक एडवोकेट डॉक्टर विलास जी खैरनार यांचा सत्कार नंदू भाऊ शिरसाठ यांनी केला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अरुण पाचोरे यांनी सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दिव्यांगांची कमिटी तयार करून प्रत्येक दिव्यांगांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करणार अशी तालुका कमिटी च्या वतीने माहिती दिली.

तसेच गावागावातील आम्ही कमिटी त्या तयार करून त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले तसेच याप्रसंगी मालन ताई आव्हाड, सीमाताई बाकळे,कविता खैरनार, रघुनाथ पावशे,सुदाम पावशे,केशव ताजने, विलास भारस्कर, चंद्रभान काकड, वैभव वेलजाळ, उपाध्यक्ष नामदेवआडके, उपाध्यक्ष गोरख तुपे, आनंद सातभाई, महेश भोसले, संघटक भगवान पगर, सचिव तात्या तासकर,रतन गायकवाड, दौलत गायकवाड, मनु भाऊ दापूर, गट प्रमुख सुनील आव्हाड, अशोक गडाख दीपक चव्हाण, बाळू शहाणे, आनंद सातभाई उपाध्यक्ष सुनील जगताप सह संपर्क प्रमुख दशरथ तुपे, गोरख तुपे, अनिल मेढे, श्याम गोसावी, दहिवाल धनंजय इ. उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles