♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पेठेची वाडी येथील लोकांसोबत आयडियाझम संस्थेने साजरी केली दिवाळी….

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

दि.10/11/2023 व 11/11/2023 रोजी आयडियाझम फॉर सोशल एनोव्हेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीत मदतीचा हात देण्यासाठी ह्या वर्षी पेठेचीवाडी (पाचनई) ता. अकोले, जि. अहमदनगर हे गाव निवडण्यात आले.

मदतीसाठी निधी सार्वजनिकरीत्या गोळा करण्यात आला. मनाच्या श्रीमंतीचे दर्शन 101 हुन अधिक दात्यांनी दाखवले, यातून निर्माण झालेल्या आर्थिक स्रोतांमधून दोन मोठे ब्लॅंकेट, राजगिरा लाडू चे मोठे पॅकेट, आकाशकंदील, लहान मुलांसाठी खाऊ याची तजबीज करण्यात आली.

साधारण 70 कुटुंबांना पूर्णत्वाने ही मदत देण्यात आली. त्याचबरोबर गावातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. जिल्हा परिषदेच्या ग्रंथालयासाठी अवांतर वाचनाची काही पुस्तके भाऊराव गावंडे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

या कार्यक्रमात मुख्य दुवा असलेले गावचे सुपुत्र भाऊराव गावंडे सर यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले यांनी जमलेल्या ग्रामस्थ, महिलांशी संवाद साधला.

गावतल्या सर्व अडीअडचींनी विषयी चर्चा करण्यात आली. एक आपुलकीची ऊब देण्याचा छोटासा पण मूलभूत प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला. उपेक्षित असलेल्या आणि उणिवांशी रोज संघर्ष करणाऱ्या माणसांना दिलासा देण्यासाठी हा कर्तव्यरुपी दिवाळीचा सण या निमित्ताने साजरा झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमध्ये काम करत असलेले अजय हांडे, संकेत बिडगर, करण गायकवाड, अनुराधा सिंग, केतन सोनवणे, पवन वायदंडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन समाजकार्याचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच आयडियाझम संस्थेचे स्वयंसेवक आकांक्षा घोडे, योगिता गांगुर्डे, आदित्य डुकरे, पुजा भोये, विकी घोडे, शुभम भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाचा उद्देश गाव पाड्यावरील संघर्ष लक्षात घेऊन मूलभूत प्रगतीसाठी प्रयत्न करणे हाच आहे. संस्थेने आपल्या दुसऱ्या दिवशीच्या नियोजनानुसार हरिश्चंद्र गडावर साफसफाई मोहीम देखील यशस्वीरीत्या पार पाडली.

अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी वाट नेहमीच उमलत राहील, असा विश्वास सर्व टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles