♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनमाड, लासलगाव व निफाड परिसरातील प्रवाशांसाठी नवीन हक्काची मेमू चालू करावी -डी के नाना जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

मनमाड,लासलगाव व निफाड परिसरातील अनेक नोकरदार वर्ग, व्यापारी, विद्यार्थी, महिला प्रवासी यांना नाशिक व इगतपुरी जाण्यासाठी सकाळी कोणतीही रेल्वे उपलब्ध नसते ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्या सर्व लांब पल्ल्याच्या असल्यामुळे महिला प्रवासी व विद्यार्थ्यांची गर्दीमुळे तारांबळ होते तसेच या गाड्या नेहमी उशिराने येत असल्याने नोकरदार वर्ग व विद्यार्थी वेळेवर आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकत नाही.

त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता परिसरातील प्रवाशांसाठी हक्काची मेमू चालू करावी तसेच कोरोनाकाळात बंद केलेल्या जनता व देवगिरी एक्सप्रेस चे थांबे पूर्वरत करावेत अशी मागणी मा. जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य श्री डी के नाना जगताप यांनी केली.

कोटमगाव व तळेगाव रोही या परिसरात असणाऱ्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंग नंबर 104 व 111 येथे रेल्वे अंडर ब्रिज चे काम लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची ने आण करणे सोपे होईल.

डि . के नाना जगताप यावेळी म्हणाले की, यापूर्वीही या परिसरातील शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांचे अडचण लक्षात घेता भुसावळ येथील डी आर एम श्रीमती इति पांडे व कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्री भारतीताई पवार यांनाही निवेदन देण्यात आले होते व परिसरातील काम लवकरात लवकर चालू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते तरी हे काम तात्काळ मार्गे लावण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची त्यांनी विनंती केली.

वरील सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी रेल्वे राज्यमंत्री माननीय श्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य श्री डी के नाना जगताप, भाजपा नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी बच्छाव व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles