♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक जिल्ह्यातील शेतीपिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी:- काँग्रेस नेते, कृषीतज्ञ सचिन होळकर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस तसेच वादळ वारे आणि अवकाळी पाऊस झाला.

या पावसामुळे द्राक्षबागा, गहू, हरभरा, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या सर्व बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी जाहीर केलेला पीकविम्याचा अग्रिम परतावा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यातच आता अवकाळी आणि गारपिट मुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

 

या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करून तात्काळ मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस, कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

याबाबत आपण लवकरच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगणार असल्याचं त्यांनी सांगितले…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles