♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी,निफाड,मनमाड,नांदगांव,चांदवड व येवला तालुक्यामध्ये अवकाळी गारपीट मुळे शेतकरी राजा उध्वस्त

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

गारपिटीने कांदा पीक आणि द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान..

 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये रविवारी वादळी वा-यासह पाऊस व गारपीटमुळे या तालुक्यातील असंख्य गावातील अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर,थेटाळे, वनसगाव, कोटमगाव, खामगाव, सारोळे या गावांनाही काल झालेल्या गारपीटीचा प्रचंड फटका बसला.

या परिसरातील प्रामुख्याने द्राक्ष बागा, फळबागा तसेच टोमॅटो, कांदा रोपे ,गहू ,हरभरा ,भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी यावेळी आपल्या व्यथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. भारतीताई पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ. उमेश काळे , कृ ऊ बा मा सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे मांडल्या.

 

लाखो रुपये खर्च करून हाततोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. गेल्या अनेक गारपीठ, अवकाळी पाऊस, कोरोना या कारणामुळे अनेक वेळा नुकसान झाले आहे. परंतु या वेळेस झालेल्या गारपीटमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
यावेळी डॉ. उमेश काळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन भारतीताई च्या माध्यमातून दिले.

यावेळी त्यांनी तत्सम तलाठी, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शंभर टक्के पंचनामे करून ते शासन दरबारी सादर करावेत असे आदेश दिले .सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबात सुवर्णाताईंनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे, संजय शेवाळे, काका दरेकर, कैलास सोनवणे,भाऊसाहेब गांगुर्डे, डॉ योगेश डुंबरे,बापू दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे, सोनाली शिंदे,सागर शिंदे, इत्यादींनी नुकसान झालेल्या शेतांची समक्ष जाऊन पाहणी केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles