♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धांची गरज- शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

कुणाल दराडे फाउंडेशन तर्फे आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर.अनेक युवक, युवतींमध्ये विविध पैलू असतात, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आज गरजेच्या आहेत यातून अनेक चांगले कलावंत उदयास येतात असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी केले.

लासलगाव येथे कुणाल दराडे फाउंडेशन च्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच शहरातील हॉटेल लिबर्टी येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे ,कृषी तज्ञ सचिन होळकर, डॉ विलास कांगणे, डॉ संगीता सुरसे,भारती ब्रम्हेचा ,आशा पवार,नलिनी सोनवणे, जयश्री बोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेत लासलगाव शहरातील एकूण ५६ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण लासलगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या माया होळकर, चैताली होळकर अनुष्का परदेशी यांनी केले.

रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक वृषाली पवार, द्वितीय क्रमांक फाल्गुनी गांगुर्डे तर तृतीय क्रमांक श्रावणी देसाई व अवधूत वाघ यांना देण्यात आला.

चौथा क्रमांक कविता चव्हाण यांनी पटकावला. १४ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत खुशी रंधे ने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

आभार डॉ विलास कांगणे यांनी मानले.कोमल परेराव ,साक्षी मालपाणी ,सुनिता वर्मा ,स्वरा सोनवणे , साक्षी भुजबळ ,श्रद्धा साळुंके ऋतिकी बोराडे ,अभिपसा सोनवणे , नक्षत्रा कासार यांच्यासह युवती व महिला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles