♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस आयुक्ताकडुन सार्वजनिक शांतता भंग करणा-यांवर करडी नजर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोंबीग/ऑल-आउट ऑपरेशन राबवुन टवाळखोरांवर धडक कारवाई

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ रोशन गव्हाणे

श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी शहरातील शरीराविरूध्द गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार तसेच समाजस्वास्थ्य बिघडवणारे टवाळखोर इसम व सार्वजनिक ठिकाणी मदयपान करून सार्वजनिक शांतता बिघडवणारे इसमांवर कारवाई करणेसाठी कोंबीग/ऑल-आउट ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), यांचे मार्गदर्शखाली सर्व विभागीय सहा. पोलीस आयुक्त, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) व सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक २८/११/२०२३ रोजीचे १९.०० ते २२.०० वाजेपावेतो सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोबींग / ऑल-आउट ऑपरेशन राबवुन टवाळखोर इसमांवर कारवाई करण्यात आली.

कॉम्बींग/ऑल-आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ-१ हददीमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापुर या पोलीस ठाणे हददीमधील ३१७ टवाळखोर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच सी.आर.पी.सी. कलम १५१ (१) अन्वये ३ व कोटपा कायदयान्वये ३० इसमांवर कारवाई करण्यात आली.

तसेच परिमंडळ-२ हददीमधील सातपुर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हददीमधील २४८ टवाळखोर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच कोटपा कायदयान्वये ०५ इसमांवर कारवाई करण्यात आली.

कॉबीग/ऑल-आउट ऑपरेशन दरम्यान शहरातील एकुण ५६५ इसमांवर मपोका. कलम ११२/११७ कायदयान्वये तसेच ३५ इसमांवर कोटपा कायदयान्वये व ३ इसमांवर सी.आर.पी.सी. १५१(१) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

यापुढेही पोलीस आयुक्तालय हद्दीत वेळोवेळी कोम्बींग /ऑल-आउट ऑपरेशन राबवून टवाळखोर व शांतता भंग करून समाजस्वास्थ्य बिघडवणारे इसम तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

सदर कारवाई  पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली ४ पोलीस उप आयुक्त, ७ सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी यांचेसह पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिटचे अधिकारी व पोलीस अंमलदार अशांनी कोबींग/ऑल-आउट ऑपरेशन राबविणेकामी सहभागी होवुन कारवाई केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles