♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनमाड येवला रस्त्यावरील कामाची गती बघण्यास केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पाहणी दौरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्य

इंदूर-पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कठड्यासह कोसळल्याची घटना बुधवारी (दि. २९) पहाटे घडली.

सुदैवाने यावेळी वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल खचल्याचे लक्षात येताच प्रशासनाने तत्काळ शिर्डी व मालेगावकडे जाणारी परस्परविरोधी वाहतूक रोखून धरल्याने जीवित हानी टळली.

 

वाहतुकीसाठी पूल बंद झाल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. भारतीताई पवार यांनी आज घटनास्थळी भेट दिली.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ चालू करून एक महिन्याच्या आत पुलाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ. सुवर्णा जगताप, उपाध्यक्ष जयप्रकाश पांडे,युवा अध्यक्ष जय फुलवाणी , नांदगाव चे नायब तहसीलदार सिध्दार्थकुमार मोरे ,सीनियर सेक्शन इंजीनियर आगरवाल, सेंट्रल रेल्वे , पीडबल्यूडी इंजिनीअर व् सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles