♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सौ.सुवर्णा जगताप यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महीला आघाडीच्या संयोजिका पदी निवड

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आगामी २०२४ ला फिर एक बार मोदी सरकार…हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी महिलांचे योगदान केंद्र स्थानावर ठेऊन भा. ज. पा. महिला मोर्चा नेतृत्वाने आज सर्व लोकसभा जागांसाठी महिला संयोजक यांची निवड केली…

 

महिला राजकारणला कायम नवीन दिशा देत असतात…याच पार्श्वभूमीवर आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका पाहता महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभांपैकी 42 जागांवर मा. सौ. चित्राताई किशोर वाघ (अध्य्क्षा बीजेपी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) यांनी महिला संयोजकांची नेमणूक केली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या संयोजक पदी सौ सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांची निवड करण्यात आली.

यावेळी त्या म्हणाल्या की, प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष तृतीय स्वतः या मंत्राप्रमाणे पक्षाचा इतिहास ,वाटचाल ,शिस्त ,विचारधारा, ध्येय धोरणे तसेच चांगल्या कार्यकर्त्यांचा शिस्तबद्ध पक्ष म्हणून आणि महिलांमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा यापुढेही वाढवत राहण्याची जबाबदारी राहिल.भाजपाची प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढीसाठी पक्षाने दिलेल्या जबाबदारीला मी पूर्ण न्याय देईल.
त्यांची निवड झाल्याबद्दल कुटुंब व समाज कल्याण राज्यमंत्री मा. भारतीताई पवार, देवळा चांदवड विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल दादा आहेर, बीजेपी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ, नाशिक दिंडोरी उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष मा. शंकररावजी वाघ, नाशिक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा. सुनील जी बच्छाव सर, नामको बँकेचे व्हाईस चेअरमन मा. प्रकाश शेठजी दायमा, मा. स्थायी समिती जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, भाजपा ज्येष्ठ नेते व ग्रामीण उत्तर विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी चाफेकर, लासलगाव मंडळ अध्यक्ष श्री निलेशजी सालकाडे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजयजी शेवाळे, जैन प्रकोष्ठ चे अध्यक्ष मनीषजी चोपडा, तसेच पक्षातील सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी ,कार्यकर्ते, वॉरियर्स बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्ते यांनी सुवर्णा जगताप यांचे अभिनंदन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles