♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शासनाबरोबरच समाजानेही दिव्यांगप्रती आपले कर्तव्य बजावले पाहिजे — सौ.सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

मंगळवार (6 डिसें.) रोजी लासलगाव ग्रामपंचायत लासलगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे शासकीय दिव्यांग  दिन साजरा करण्यात आला.

इ.स.१९९२पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे. दीव्यांग व्यक्ती कुणाला ओझे न ठरता ती स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावी. तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये. यासाठी जागतिक स्तरावरील आरोग्य संघटना प्रयत्नशील व कार्यप्रवन रहावी म्हणून तीला हा प्रेरणादायी दिवस ठरवून देण्यात आला आहे.

याप्रसंगी मा. सभापती तथा संचालिका कृ उ. बा समिती, लासलगाव च्या सुवर्णा जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करताना समाजात वावरताना लोक दिव्यांग लोकांना मदत करत नाहीत.

अपमानास्पद वागणूक देतात. शारीरिक अपंग बरोबरच अशा व्यवहाराने मानसिक अपंगत्व पण येते.त्यामुळे त्यांची परवडत थांबवली पाहिजे. काही व्यक्ती जन्मतः शारीरिक दिव्यांग असतात तर काही अपघाताने दिव्यांग झालेल्या असतात.

ते काहीही असले तरी त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ..म्हणून शासनासह समाजाने सुद्धा त्यांच्याबद्दलचे आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने त्यांना जीवन जगण्याचा अधिकार ,बळ व नवी उमेद मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून भुसावळ डिव्हिजनला पडून असलेले दिव्यांग रेल्वे कन्सेशन पास सुवर्णा जगताप यांनी पाठपुरावा करून मागून घेतले व याप्रसंगी रेल्वे कन्सेशन पास तसेच अंतोदय शिधा कार्ड चे लासलगाव परीसरतील दिव्यांग लोकांना वाटप करण्यात आले.

दोन महिन्यापूर्वी लासलगाव येथील दिव्यांग अविनाश देसाई यांचे घर पूर्णपणे जळून त्यांचे नुकसान झाले होते याप्रसंगी सुवर्णा जगताप यांनी त्यांना आर्थिक मदत दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी लासलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच रामनाथ शेजवळ, टाकळीच्या सरपंच अश्विनी जाधव, ग्रामपंचायत सदस्या ज्योती सुरासे, ज्योती निकम, ह भ प सरचिटणीस बाळासाहेब शिरसाट, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील ,प्रहार संघटनेचे अध्यक्ष अनिलजी भावसार, उपाध्यक्ष मनोज परेराव ,सचिव राजू सुरसे,खजिनदार सागर धुमाळ,संपर्क प्रमुख भूपेंद्र जैन तसेच लासलगाव परिसरातील दिव्यांग जन,संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles