♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना लासलगाव/टाकळी/पिंपळगाव नजिक/कोटमगाव/विंचूर आणि ग्रामपंचायत लासलगाव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना लासलगाव/टाकळी/पिंपळगाव नजिक/कोटमगाव/विंचूर आणि ग्रामपंचायत लासलगाव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


लढवय्ये आमदार आणि दिव्यांगांच्या मनामध्ये देवाचे स्थान मिळवलेले आमदार ओम प्रकाश कडू यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या भारतातील पहिलेच दिव्यांग मंत्रालय, यावेळी प्रथमच शासकीय स्तरावर दिव्यांग सप्ताह चे करण्यात आलेले आयोजन, भारताचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग ही उपाधी प्रदान करून अपंगांसाठी देशपातळीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्याबद्दल केलेल्या सूचना आणि त्यांची होत असलेली अंमलबजावणी यांचे पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक अपंग दिन हा उत्साहाने साजरा करण्यात आला.

लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे वरील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला परिसरातील दिव्यांग बांधव आणि त्यांचे हितचिंतकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी आपल्यातील दिव्यांग बंधू अविनाश देसाई यांचे दुकानाला आग लागली त्यात त्यांचे दुकान सर्वस्वी जळून खाक झाले अशा वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने मदतीचा हात म्हणून 5900 ची रक्कम अविनाश देसाई याना दिव्यांग दिनाच्या दिवशी देण्यात आली.

लासलगाव परिसरातील कोणाही व्यक्तीवर आलेल्या कोणत्याही संकटाला किंवा अशा संकटाची माहिती मिळताच त्वरेने धावून जाणाऱ्या आणि तत्परतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या सुवर्णा ताई जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य डिके नाना जगताप यांच्या पुढाकारातून यावेळी अविनाश देसाई या संपूर्ण दुकान आगीत भस्म झालेल्या दिव्यांग सलून व्यावसायिकास रुपये पाच हजाराची मदत देखील व्यक्तिगत रित्या जाहीर करून ताबडतोब अदा देखील केली .

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना लासलगाव च्या पाठपुराव्याने 21 अंत्योदय रेशनकार्ड तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय कार्यालयाकडून सुवर्णाताई जगताप यांच्या प्रयत्नाने तत्पर मिळालेल्या ४५ रेल्वे सवलत प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविकात वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व पत्रकार संघाचे सदस्य ह भ प बाळासाहेब महाराज शिरसाठ कोटमगावकर यांनी दिव्यांगांना हिमतीने जगण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी लासलगाव, टाकळी वि .येथील ग्राम विकास अधिकारी शरद पाटील, पिंपळगाव नजीक गटविकास अधिकारी उबाळे उपसरपंच रामनाथ शेजवळ,कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सौ सुवर्णा ताई जगताप,टाकळी विंचूर सरपंच सौ. अश्विनी जाधव,ग्रामपंचायत सदस्य ज्योती ताई सुरासे यांचे मार्गदर्शन दिव्यांगांना लाभले.

यावेळी गटविकास अधिकारी शरद पाटील यांनी शासकीय सुविधांबद्दल दिव्यांगांना माहिती दिली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुवर्णाताई जगताप व रामनाथ शेजवळ यांनी दिव्यांगांना लागणाऱ्या सुविधांसाठी सर्वस्वी प्रयत्न करण्याचे आश्वासन आणि लासलगाव परिसरातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवन व संस्था कार्यालय उभारून देण्या साठी ग्रामपंचायत इकडून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले.

सर्व मान्यवरांचे सत्कार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.

सोहळ्याचे सूत्रसंचालन बाबा अमरनाथ समूहाचे सर्वेसर्वा राजाभाऊ जाधव यांनी नेटकेपणाने केले, तर सोहळा यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles