♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालयास मंजुरी…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

येवला मतदारसंघात २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी ३ कोटी ९० लाख निधी मंजूर

 

नागपूर,मुंबई,नाशिक,येवला,दि.७ डिसेंबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. यासाठी ३ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महसुली कामांसाठी अधिक सुविधा मिळणार आहे.

येवला मतदारसंघातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांचे कामे प्रगतीपथावर आहेत मात्र उरलेले २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालय मंजुरीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला तालुक्यात एकूण २ मंडळ अधिकारी व २५ तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून निफाड तालुक्यातील उर्वरीत गाजरवाडी व नांदूरमध्यमेश्वर तलाठी कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. यामुळे मतदारसंघातील नागरिकांना महसुली सुविधा जलद गतीने मिळण्यास अधिक मदत होणार आहे.

येवला शासकीय विश्राम गृहासाठी ५ कोटी ८१ लाख तर प्रशासकीय संकुलातील बैठक कक्षाचे नुतनीकरण करण्यासाठी ६२ लाख रुपये मंजूर

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला शासकीय विश्राम गृहासाठी ५ कोटी ८१ लाख १७ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच येवला प्रशासकीय संकुलातील बैठक कक्षाचे नुतनीकरण व फर्निचरचे काम करण्यासाठी ६२ लक्ष ८४ हजार इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles