♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येवला मतदारसंघातील रस्त्यांना पुन्हा मिळणार झळाळी…..

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

येवला मतदारसंघात रस्त्यांच्या सुधारणेसाठी पुरवणी अर्थसंकल्पातून ८० कोटी ७० लाखांच्या निधीची तरतूद

नागपूर,मुंबई,नाशिक,येवला,निफाड,दि.७ डिसेंबर :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ८० कोटी ७० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.करण्यात आला आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातील रस्त्यांना पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होऊन नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला मतदारसंघासाठी डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला तालुक्यातील अनकाई कुसमाडी नगरसुल अंदरसुल पिंपळगांव जलाल रोड रामा-४५१ किमी ४५/०० ते ५५/९०० रक्कम ४.८० कोटी,पाटोदा येवला नांदगाव रोड एस.एच.२५ ची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, तालुका हद्द ते नायगव्हाण कुसमाडी धामोडे नांदूर ते बाभूळगाव राज्य महामार्ग ४५३ ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी २० लाख, तालुका हद्द ते नायगव्हान कुसमाडी धामोडे नांदूर बाभूळगाव ते प्रमुख राज्य मार्ग ८ ते राज्य महामार्ग ४५३ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी, वापी ते निफाड येवला रोड एमएसएच २ या रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी ५० लाख, पाटोदा येवला नांदगाव रोड एस.एच २५ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ९० लाख,पढेगाव न्याहारखेडा रेंडाळे ममदापूर प्रमुख जिल्हा मार्ग ७७ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,प्रमुख जिल्हा मार्ग ७७ न्याहारखेडा अंगुलगाव गारखेडा गवंडगाव देवळाणे दुगलगांव रस्ता सुधारण्यासाठी ४४ लाख, येवला पारेगाव निमगाव मढ महालखेडा भिंगारे पुरणगाव ते प्रमुख राज्य मार्ग २ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी,मनमाड येवला महामार्ग ते विखरणी कानडी पाटोदा दहेगाव धामोडे जऊळके मुखेड फाटा सत्यगाव ते धामोरी हद्द रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तर अनकाई नायगव्हाण पिंपळखुटे पन्हाळसाठे राजापूर प्रमुख जिल्हा मार्ग ७० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ५० लाख, राज्य महामार्ग २५ पासून राजापूर ते रेंडाळा खरवंडी रहाडी प्रमुख जिल्हा मार्ग १८० ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी, प्रमुख राज्य आर्ग ०८ ते नांदेसर उंदीरवाडी बोकटे खामगाव ते प्रमुख राज्यमार्ग ०२ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग ८० पासून आडसुरेगाव धूळगाव प्रमुख जिल्हा मार्ग १७९ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,धुळगाव सातारे पिंपळगाव लेप जऊळके शिरसगाव लौकी शेळकेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग ६९ ची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५० लक्ष,पढेगाव न्याहारखेडे रेंडाळे ममदापूर प्रमुख जिल्हा मार्ग ७७ ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लाख,पढेगाव न्याहारखेडे रेंडाळे ममदापूर प्रमुख जिल्हा मार्ग ७७ ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,मनमाड राजापूर एकवाई भालूर राजापूर ममदापूर खरवंडी भारम प्रमुख जिल्हा मार्ग ७६ ची सुधारणा करण्यासाठी २ कोटी निधीची तरतूद झाली आहे.

त्याचप्रमाणे ग्रामीण मार्गांमधील शिरसगाव लौकी ते सोमठाण देश ग्रामीण मार्ग २० ची सुधारणा करण्यासाठी १५ लक्ष, अंगणगाव भालेराव वस्ती ते रायते बाभूळगाव लोंढे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी ४० लाख रुपये तर तळवाडे ते गवंडगाव व देवठाण रस्ता सुधारणा, देवगाव मुखेड ते दत्तवाडी ते सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, जळगांव नेऊर ते प्रमुख राज्य मार्ग २ ते देशमाने जऊळ्के ते देवगाव रस्ताची सुधारणा, येवला सबस्टेशन ते अंगणगाव बाभूळवाडी शिव भालेराव वस्ती रस्ता सुधारणा, अंदरसूल देवानंदवाडी देवरेवस्ती अंगुलगाव रस्त्याची सुधारणा, राज्य मार्ग २५ भाटगाव अंतरवेली पिंप्री ठाणगाव कानडी ते आडगाव रेपाळ प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा, अंदरसूल ते करंजी रस्ता सुधारणा, अंदरसुल ते जयहिंदवाडी रस्त्याची सुधारणा, अंदरसुल ते गोल्हेवाडी रस्त्याची सुधारणा, राज्य महामार्ग २५ ते नगरसूल गायकवाड वस्ती नागरे वस्ती ते मातुलठाण रस्त्याची सुधारणा, पिंपळगाव जलाल ते रेल्वे चौकी रस्त्याची सुधारणा,आडसुरेगाव भाटगांव ते तालुका हद्द रस्त्याची सुधारणा, तळवाडे ते ग्रामीण मार्ग ८२ रस्त्याची सुधारणा, कानडी ते गुजरखेडे बाळापुर रस्त्याची सुधारणा, महालखेडा ते पांजरवाडी रस्ताची सुधारणा, राज्य महामार्ग २ कोटमगाव बु.ते उंदीरवाडी रस्त्याची सुधारणा, जळगाव नेऊर ते आडवाट रस्त्याची सुधारणा, धामनगाव ते महादेववाडी या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी ३० लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर गवंडगाव ते कौटखेडे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४८ लाख, अंदरसुल ते कौटखेडे रस्ता ग्रामीण मार्ग ६६ ची सुधारणा करण्यासाठी ४० लाख, बाभूळगाव गट न ५५ रायते रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५० लाख, गारखेडा देवठाण रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४० लाख, इतर जिल्हा मार्ग कुसूर दत्तमंदिर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लाख, महालखेडा पाटोदा चारी नंबर ३४ भिंगारे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लाख, पढेगाव न्याहारखेडा रेंडाळे ममदापूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसुल ते नांदुर ग्रामीण मार्ग ६३ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६० लाख, नगरसूल ते लहित जायदरे ग्रामीण मार्ग १०१ ची सुधारणा करण्यासाठी ६० लाख, सावरगाव भाटगांव रायते चिचोंडी निमगाव मढ रवंदा प्रमुख जिल्हा मार्ग ७३ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी ३ कोटी, रुपये निधी असा एकूण येवला तालुक्यातील रस्त्यांसाठी ६७ कोटी ३७ लक्ष रुपये निधी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तर निफाड तालुक्यातील धुळगाव शिरसगाव लौकी शेळकेवाडी पाचोरे बु.लासलगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ६९ ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी, नांदगाव ते धारणगाव गाजरवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२७ ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, राज्य महामार्ग ७ ते शिरवाडे वाकद ते तालुका हद्द प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, तर ग्रामीण मार्ग असलेल्या विंचूर वेस राऊत वस्ती ते विठ्ठलवाडी रस्ता ग्रामीण मार्ग २२८ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ८० लक्ष, रुई ते सांगवी रस्ता इतर जिल्हा मार्ग १७९ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६३ लक्ष, विंचूर किसनवाडी रस्ता ग्रामीण मार्ग ४१० ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी, पिंपळगाव नजिक तालुका हद्द ते वहागाव रस्ता गर्मीन मार्ग ७५ ची सुधारणा करण्यासाठी ९० लक्ष, सारोळे खुर्द ते जोपूळ बॉर्डर रस्ता ग्रामीण मार्ग १०३ विनिता नदी पुलापासून सुरेश वन्से यांच्या वस्तीपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी असे एकूण निफाड तालुक्यातील रस्त्यांसास्ठी १३ कोटी ३३ लाखांच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles