♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

झारखंड चे खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारून,काळे फासून त्याचे दहन करून निषेध करण्यात आला

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

झारखंड चे खासदार धीरज साहू हे जवळपास 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पकडले गेले. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात येवला लासलगाव मतदार संघ लासलगाव, टाकळी रेल्वे स्टेशन त्रिफुली येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महिला मोर्चाच्या संयोजिका सौ सुवर्णा जगताप यांच्या नेतृत्वाखाली व आयोजनात आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजाभाऊ चाफेकर, लासलगाव मंडल अध्यक्ष श्री निलेश सालकाडे व जेष्ठ नेते दत्तुलाल्जी शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

6 डिसेंबर रोजी काँग्रेसचे राज्यसभा खासदार बलदेव साहू आणि समूहाच्या झारखंड आणि उडीसा मधील दहा ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले बलदेव साहू कंपनीच्या सातपुडा कार्यालय तसेच त्यांची काही घरे कार्यालय डिस्टलरी येथे छापे टाकण्यात आले त्यात जवळजवळ 10 20 30 नाहीतर 3५० कोटीचे घाबाड आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागले आणि 157 मोठे बॅग मधून ही रक्कम आयकर विभागाला न्यावी लागली अनेक बेकायदेशीर व्यवसाय असलेले धीरज प्रसाद साहू काँग्रेसचे राज्यसभेचे तीन वेळेचे खासदार राहिलेले आहेत शिवाय त्यांचा दारू विक्री आणि गाळण्याचा सुद्धा व्यवसाय आहे.
यावेळी सुवर्णा जगताप जगताप म्हणाल्या की जिथे जिथे काँग्रेसची सरकार असतात तेथे तेथे असे नेते काँग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची जनतेची लूट करतात हा काँग्रेसचा गुणधर्मच आहे याचा पुरावा आपल्याला नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मिळाला काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला आणि मनमारी कारभाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिल आता झारखंड मधील या 3५० कोटीच्या प्रकारामुळे काँग्रेस बिलकुल सुधारली नाही हे दिसून येते.

देशाला लबुाडणारा काँग्रेसचा ‘हात’ आहे आणि देशात विकासाची भरभराट करणारं भाजपचं कमळ आहे, आणि भारताच्या जनतेला हा फरक लक्षात आलेला आहे. कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गॅरंटी असते आणि जिथे भाजपाची सत्ता असते तिथे विकासाची म्हणजेच मोदींची गॅरंटी असते असेही त्या या वेळेस म्हणाल्या.
निषेध व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणा दिल्या तसेच साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारून काळे फासून त्याचे दहन करण्यात आले.


यावेळी सर्व प्रदेश पदाधिकारी, शहर जिल्हा भाजपा सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चे, आघाडी पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते.
जिल्हा चिटणीस ज्योती शिंदे,लासलगाव मंडल सरचिटणीस भारती महाले,लासलगाव मंडल महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली शिंदे, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्षा शैलजा भावसार,ओबीसी महिला मंडल अध्यक्ष उषा कुमावत,मंडल महिला मोर्चा सरचिटणीस नंदा शर्मा, लासलगाव शहराध्यक्षा रंजना शिंदे,शहर सरचिटणीस कल्पना वाघ,योगीता आंबेकर – पिंपळगाव शहराध्यक्षा…तसेच संगीता बागुल, विद्या माठा, फरीदा शेख, छाया शेटे, शालिनी केळकर, सगुना शिंदे, रेणू हिरे, कविता लोहारकर या सर्व महिला पदाधिकारी उपस्थीत होत्या.
महिला मोर्चा पदाधिकारींना आज भाजपा मंडल पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी यांची साथ लाभली.यावेळी मंडल उपाध्यक्ष सोमनाथ गांगुर्दे,उद्योग आघाडी प्रमुख नितीन शर्मा,युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय वाघचौरे,लासलगाव शहर सरचिटणीस मनीष चोपडा,सरपंच परिषद मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,अल्पसंख्याक युवा जिल्हा अध्यक्ष अयाज शेख,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण खलसे,कैलास बोराडे,संतोष चौधरी,ऋतुराज शिंदे हे सर्व उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles