♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगावात अग्निशामक यंत्रणा मिळणेबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला नागरिकांचे निवेदन…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

लासलगाव आणि परिसरात अग्निशामक यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

लासलगाव हे मोठे व्यापारी बाजारपेठ असणारे गाव आहे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व्यवसाय करतात शिवाय बाजार समिती असल्याने दररोज येणारी वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते, काही दिवसांपूर्वी लासलगाव येथे गाळ्यांना लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे लासलगाव येथे अग्निशामक यंत्रणा मिळण्यासाठी सचिन आत्माराम होळकर, योगेश पाटील, प्रमोद पाटील, संतोष पानगव्हाणे, शिवा सुराशे, डॉ युवराज पाटील, रोहित जगताप, संतोष पवार, महेश मोरे, प्रविण सोनवणे, शुभम आहेर, अविनाश देसाई, रामनाथ आसुले आदी नागरिकांनी निवेदन दिले.

निवेदन दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर आणि बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासोबत निवेदकांनी सविस्तर चर्चा केली.

स्वतंत्र अग्निशामक वाहन लासलगावसाठी ठेवणे तसेच त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे शक्य नसल्याने बाजार समितीच्या ट्रैकरवर विशिष्ट यंत्रणा बसून अग्निशामकाचे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

लवकरच या प्रकारची यंत्रणा लासलगावसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी ग्रामस्थाना दिले. लासलगाव परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच जवळच असणाऱ्या विंचूर एमआयडीसी सारख्या बाबींमुळे अग्निशामक यंत्रणा असणे खूप आवश्यक आहे सदर यंत्रणा मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे मत सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

सदर निवेदनाची प्रत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती तसेच सर्व संचालक मंडळांना पाठवण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles